संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागाच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रतिप दहिफळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीचे पञ अहमदनगर जिल्हा काॅग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष रेवनाथ देशमुख यांनी दिले आहे.
श्री दहिफळे यांच्या नियुक्ती झाल्याबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे, काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे आदिंसह नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व कमिट्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.