*अहमदनगरला दिवाळी निमित्त कल्याण रोडवर होलसेल फटाका मार्केट सुरु*

अहमदनगरला दिवाळी निमित्त कल्याण रोडवर होलसेल फटाका मार्केट सुरु
व्यवसाय हा प्रामाणिक हेतू बाळगूनच करावा – श्री आदित्यनाथ महाराज
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – दिवाळी सण जवळ आल्याने नागरिकांची खरेदीची लगबग व तयारी सुरु झाली आहे. दिवाळीला फटाक्यांना विशेष महत्व आहे. नगर मध्ये कल्याण रोडवर अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे जिल्ह्यातील एकमेव होलसेल फटाका विक्री मार्केटचे उदघाटन श्रीविशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांचे शिष्य आदित्यनाथ महाराज यांच्या हस्ते फीत कापून फटाका विक्री मार्केटचे व प्रवेशद्वाराचे उद्घाटन झाले. यावेळी असोसिएशनचे सुरेश जाधव, सचिव श्रीनिवास बोज्जा, सहसचिव अरविंद साठे आदींसह सदस्य उपस्थित होते.


अध्यक्ष सुरेश जाधव म्हणाले, नगर शहरातील हे फटाका मार्केट जिल्ह्यातील एकमेव होलसेल मार्केट असून पूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. सर्वात कमी दरात येथे फटाके मिळत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यातील किरकोळ व्यापारी फटाके खरेदीसाठी याच मार्केटवर अवलंबून असतात. या वेळी असोसिएशन चे माजी अध्यक्ष व सचिव श्रीनिवास बोज्जा म्हणाले जिल्ह्य प्रशासनान दरवर्षी आम्हाला सहकार्य करीत असून एका महिना अगोदर फटाका विक्रीचे परवाने उपलब्ध करून देत आहेत. आमचे असोसिएशन वर्षभर सामाजिक जाणीवेतून काम करत असून गोरगरिबांसाठी उपक्रम राबवत असल्याने प्रशासनही आम्हाला सहकार्य करत आहे.
यावेळी आदित्यनाथ महाराज यांनी व्यवसाय हा प्रामाणिक पणे करावा, कोणाचेही नुकसान होऊ नये, वाद होऊ नये याच पद्धतीने करावे मी सर्वांचा व्यवसाय चांगला होवो यासाठी श्री विशाल गणेश चरणी प्रार्थना करतो असे म्हणून शुभेच्छा दिल्यात . अरविंद साठे यांनी प्रास्ताविक केले, उमेश क्षीरसागर यांनी आभार मानले. यावेळी फटाका व्यापारी सुनील गांधी, देवीदास ढवळे, संजय सुराणा, अमोल तोडकर, मयूर भापकर, दाजी गारकर, कराळे, उमेश क्षिरसागर, उबेद खान, विकास पटवेकर, स्वप्नील गांधी, सुनील टेकवाणी, बंडू दारकुंडे, संतोष वल्ली, दाजी गारकर, अविनाश जिंदम व व्यवस्थापक टोकसिया आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!