अमृत महाआवास अभियानात नाशिक विभागात अहमदनगर जिल्ह्यास प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम क्रमांक

अमृत महाआवास अभियानात नाशिक विभागात अहमदनगर जिल्ह्यास प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम क्रमांक
राज्य पुरस्कृत योजनेत ही प्रथम क्रमांक मिळाला अहमदनगर जिल्ह्यास १२ मानांकनात एकूण १४ पुरस्कार प्राप्त
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नाशिक : विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे अमृत महा अवासअभियान व यशवंत पंचायत राज पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम विभागीय आयुक्त नाशिक राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी वितरित करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर, उपायुक्त आस्थापना व विकास उज्वला बावके -कोळसे, सहाय्यक आयुक्त चौधर, विभागातील पाच जिल्ह्यांचे प्रकल्प संचालक, पुरस्कार प्राप्त डिआरडीएचे अधिकारी, कर्मचारी, पंचायत समितीचे, गट विकास अधिकारी ग्रामसेवक सर्व तालुक्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


अमृत महाआवास अभियानात नाशिक विभागात अहमदनगर जिल्ह्यास प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम क्रमांक व राज्य पुरस्कृत योजनेत ही प्रथम क्रमांक मिळाला अहमदनगर जिल्ह्यास बारा मानांकनात एकूण १४ पुरस्कार प्राप्त झाले. त्याबद्दल विभागीय आयुक्त नाशिक यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विशेष कौतुक केले व अहमदनगर जिल्ह्याने ग्रामविकास विभागात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विभागात व राज्यात यश संपादन केले असे गौरव उद्दगार काढले. पुरस्कारा वितरण कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना अहमदनगर जिल्ह्याने केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा व नांदगाव (ता.नगर) येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमांची यशोगाथा व्यक्त केली.
राहाता पंचायत समितीस राज्यस्तरीय यशवंत पंचायत राज पुरस्कार प्राप्त झाला. त्याचप्रमाणे गुणवंत अधिकारी पुरस्कार उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे यांना मिळाला.
आजच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात नाशिक विभागात सर्वात जास्त पुरस्कार अहमदनगर जिल्हास प्राप्त झाले.
1) प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा- अहमदनगर (प्रथम)
2) प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट तालुका-
पाथर्डी प्रथम
कर्जत -तृतीय
3) प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत –
माळेवाडी, तालुका पाथर्डी
4) प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट बहुमजली गृह संकुल ग्रामपंचायत – सुपे, तालुका -कर्जत
5) प्रधानमंत्री आवास योजना विभागातील सर्वोत्कृष्ट गृह संकुल हाउसिंग अपार्टमेंट -ग्रामपंचायत वांगदरी, तालुका- श्रीगोंदा,
6) राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा –अहमदनगर (प्रथम)
7) राज्य पुरस्कृत योजना सर्वोत्कृष्ट तालुका –
जामखेड- प्रथम
शेवगाव -व्दितीय,
नेवासा- तृतीय.
8) राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत- आरणगाव, तालुका -जामखेड,
व्दितीय -गोळेगाव, तालुका -शेवगाव,
9) राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट बहुमजली गृह संकुल ग्रामपंचायत- शिरसगाव, तालुका- श्रीरामपूर
10) राज्य पुरस्कृत आवास योजना विभागातील सर्वोत्कृष्ट गृह संकुल हाउसिंग अपार्टमेंट- ग्रामपंचायत -नांदगाव, तालुका -नगर, अहमदनगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!