अज्ञान पिडीत मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणा-या आरोपीस ३ वर्षे , सक्तमजुरी व दंडाची शिक्षा’

अज्ञान पिडीत मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणा-या आरोपीस ३ वर्षे , सक्तमजुरी व दंडाची शिक्षा’
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचेवर अत्याचार केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी आरोपीस भा.द.वि. कलम ३५४ अ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ८ व १२ या अन्वये दोषी धरून आरोपीस बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ८ नुसार ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रू.२ हजार दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद त्याचबरोबर कलम १२ नुसार २ वर्षे सक्त मजुरी व रक्कम रु.२ हजार दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. शिक्षा झालेल्या आरोपीचे पोपट म्हातारदेव फुंदे असे त्याचे नाव आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील श्रीमती मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले.


घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, दि. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलीची आई फिर्यादी ही पिडीत मुलीसोबत शेतामध्ये काम करीत होती. त्यावेळी ती पिडीत मुलीला शेळी कोठे गेली आहे? तिला घेऊन ये. असे सांगितल्याने पिडीत मुलगी ही त्यांचे शेताजवळील गावात राहणारा आरोपी
पोपट फुंदे यांच्या संत्राच्या बागेकडे शेळी बघायला गेली. तिथे गेल्यानंतर आरोपीने पिडीत मुलीला
त्याचा मोबाईल गेम खेळायला दिला. ती मोबाईलवर गेम खेळत असताना आरोपीने पिडीत मुलीला बळजबरीने खाली झोपायला लावले. तिचे कपडे काढले व स्वतःचे देखील पॅन्ट काढली. आरोपी हा पिडीत मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत असताना गावात राहणा-या एका व्यक्तीने सदरची घटना पाहून मोठं मोठयाने आवाज दिले. त्यामुळे आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेला. घटनेनंतर पिडीत मुलीने व सदर व्यक्तीने संपूर्ण घटना ही पिडीत मुलीच्या आईला सांगितली. पिडीत मुलीचे वडील बाहेरगावी कामासाठी गेले असल्याने ते दोन दिवसांनी परत आल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने पाथर्डी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरूध्द भा.द.वि. कलम ३५४ अ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ७, ८ व १२ नुसार फिर्याद दिली.
घटनेचा संपूर्ण तपास सपोनि प्रविण बी. पाटील यांनी करून न्यायालयात आरोपींविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये
अल्पवयीन पिडीत मुलगी तसेच पिडीत मुलीची आई, पंच साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासी
अधिकारी, तसेच वयासंदर्भात पाथर्डी नगरपरिषदेचे माहितगार यांची साक्ष नोंदविण्यात आली. या केसची सुनावणी चालू असताना सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की, पिडीत मुलगी ही घटनेच्या वेळी केवळ १२ वर्षांची होती. अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो व त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांचे मनावर पडतात. आरोपीने अत्यंत वाईट पध्दतीने सदरची घटना केलेली आहे. त्यामुळे आरोपीला जर या केसमध्ये निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वय वर्षे १२ असलेली अज्ञान मुलगी ही आरोपी विरुध्द काहीही कारण नसताना खोटे का सांगेल? त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली.
खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील श्रीमती मनिषा पी. केळगंद्रे – शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पो. कॉ. अडसुळ, तसेच पो.कॉ. अरविंद भिंगारदिवे यांनी सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!