अखेर चिंचपूर पांगुळ सेवा सोसायटी बिनविरोध ; आता सत्ताधा-यांची वाटचाल जि.प. व पं.स. निवडणुकीकडे !

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी –
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत नसलेल्या डोंगरळा परिसरातील चिंचपूर पांगुळ व मानेवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणुकीत मातब्बरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, यामुळेच मानेवाडीसह चिंचपूर पांगुळ ही पण सेवा संस्था बिनविरोध झाली आहे. आता सत्ताधा-यांची वाटचाल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे सुरु झाली आहे.


चिंचपूर पांगुळ व मानेवाडी या दोन्ही ही संस्थेची निवडणूक कधी जाहीर झाली, याबाबत मोठ्या खुबीने गुप्तता बाळगण्यात आली, याबाबत संबंधितांनी वर्तमानपत्रालाही दोन्ही संस्थेची निवडणूक माहिती समजू दिली नाही. अथवा तेवढी काळजी घेण्यात आली होती. या निवडणुकीची जाहीर वाचता झाली तर याचा परिणाम संस्थेच्या अनेक सभासदांवर होईल. या गुप्ततेमुळे अनेक इच्छूकांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसांपर्यंत माहिती मिळाली नव्हती, यामुळेच अनेक इच्छुकांना होणा-या संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरता आले नाही, हिच परिस्थितीही म्हणजेच सत्ताधा-यांनी चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आखली, अशी खंतही ग्रामस्थांसह संस्थांच्या सभासदांनी खाजगी बोलताना व्यक्त केली आहे. यामुळे येणा-या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नाराजी थोपविणे सत्ताधारी मंडळींना अवघड होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे आता येणारे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायत व सोसायटीतील सत्ताधारी कुणा कुणाला तोंडघाशी पाडता की काय, हे पाहणे औचित्याचे ठरेल., असो….
१३ जागेसाठी होत असणारे निवडणुकीतून उमेदवारी अर्ज भरणा-यांपैकी तीनजणांनी मंगळवार (दि.३१ मे) या शेवटच्या अर्ज माघारीच्या अर्ज मागे घेतले. चिंचपूर पांगुळ संस्थेच्या १३ जागेंसाठी १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये मातब्बर असे रामदास बयाजी आंधळे ,सोनाजी मुरलीधर बडे,अण्णा उत्तम बडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळेच प्रत्येकी जागेसाठी एक-एक उमेदवारी अर्ज राहिल्याने सत्ताधा-यांची सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले.
शेवंगाव-पाथर्डीचे माजी आमदार स्व.दगडू पाटील बडे यांचे चिरंजीव तथा सोसायटीचे विद्यमान संचालक धनंजय दगडू पा. बडे यांच्या नेतृत्वाखाली हि निवडणूक पार पाडली. संस्थेच्या स्थापनेपासून (१९५४)आजपर्यंत स्व.दगडू पा. बडे यांच्या पॅनलच्या हाती सत्ता कायम राखण्याची परंपरा यावेळीही भाजप अ. नगर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे पा.यांनी राखली आहे.
संचालक मंडळाच्या सर्वसाधारण कर्जदार मंतदार संघातून सर्वश्री धनंजय दगडू पा. बडे,आजीनाथ शिवराम बडे,नारायण काशिनाथ बडे,बाबासाहेब विठ्ठल बडे,बयाजी किसन आंधळे,दादासाहेब मारुती बडे,केशव राजेंद्र होडशीळ,बाबासाहेब दत्तू बडे तर महिला राखीवमधून: सौ.कौशल्या मुरलीधर बडे, सौ.गयाबाई सोपान बडे, विजाभज: प्रकाश एकनाथ बडे इतर मागास प्रवर्गमधून: जलील अकबर शेख, अनुसूचित जाती-जमाती: भाऊसाहेब लक्ष्मण रंधवे असे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
यावेळी बोलताना धनंजय बडे यांनी सांगितले की, संस्थेची निवडणूक बिनविरोध होणे कामी सर्व मा.सभासद व सर्व गांवकरी मंडळी यांनी विशेष सहकार्य केले. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.आमच्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र होऊन दाखवू.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ई.एम.राठोड यांनी काम पाहिले. तर त्यांना सचिव दगडू भीमराव बडे ,सहसचिव वासुदेव बडे यांनी सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!