अखेर एमआयडीसी कार्यकारी अभियंता गणेश वाघला अटक ;  ४ दिवस पोलीस कोठडी

अखेर एमआयडीसी कार्यकारी अभियंता गणेश वाघला अटक ;  ४ दिवस पोलीस कोठडी
👉अखेर एमआयडीसी कार्यकारी अभियंता गणेश वाघला अटक, ‘एसीबी नाशिक टिम’ला यश
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : Anti corruption
१ कोटी रुपयांच्या लाचप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार असलेला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला अटक करण्यात ‘ॲटीकरप्शन नाशिक टिम’ला यश आले आहे. १२ दिवसांपासून शोध घेत असणा-या ॲटीकरप्शन नाशिक टिम’ने गणेश वाघ याला मुंबईकडून धुळ्याकडे जात असताना अटक करण्यात आले. वाघ याला मंगळवारी (दि.१४ नोव्हेंबर) दुपारी जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ४ दिवस दि. १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


    एमआयडीसी अधिकाऱ्यांची लाचखोरी उघडकीस आली असून अहमदनगर येथील सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड (वय ३२ रा.प्लॉट नं २ आनंदविहार नागापुर, अहमदनगर, मुळ रा. चिंचोली ता.राहुरी) यास तब्बल एक कोटी रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्याने लाच स्वतःसाठी तसेच तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या करीता स्वीकारली होती‌.
्याप्रकरणी गायकवाड आणि वाघ या दोघांविरुद्ध नगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. शुक्रवारी केलेल्या या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली होती. नाशिक विभागात झालेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत १०० एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे दोन कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रूपयांचे बिल मिळावे म्हणून सदर बिलांवरती तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेवुन सदरचे देयक पाठविण्याचे मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्या करीता या बिलाचे कामाचे व यापुर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिस म्हणुन एक कोटी रूपये लाचेची मागणी करून लाच स्विकारण्याचे मान्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!