संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (video)
अहमदनगर : अंकुश चत्तर खून प्रकरणातील सात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. स्वप्निल रोहिदास शिंदे (वय 40, रा. गुरुकृपा सोसायटी, श्रमिक बालाजी चौक, अहमदनगर), अक्षय प्रल्हादराव हाके (वय 33, रा. नंदनवन नगर, बंधन लॉन मागे, सावेडी अहमदनगर), अभिजीत रमेश बुलाख (वय 33, रा. दिपवन अपार्टमेंट, गजराज फॅक्ट्ररी जवळ, बेहस्तबाग, अहमदनगर), महेश नारायण कु-हे (वय 28, रा. साईनगर, वाघमळा, सावेडी, अहमदनगर), सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे (वय 25, रा. भुतकरवाडी, सावेडी अहमदनगर), मिथुन सुनिल धोत्रे (वय 23, रा. पवननगर, बेहस्तबाग, सावेडी, अहमदनगर) व एक विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेतले.
एसपी राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनुसार एलसीबीचे सपोनि गणेश वारुळे, हेमंत थोरात, पोसई तुषार धाकराव, सोपान गोरे, सफौ भाऊसाहेब काळे, पोना रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, भिमराज खर्से, पोकॉ बाळु खेडकर, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, चापोहकॉ चंद्रकांत कुसळकर, चापोकॉ अरुण मोरे तसेच सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, अतुल लोटके, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, विजय वेठेकर, विश्वास बेरड, देवेंद्र शेलार, पोना विशाल दळवी, संदीप दरदंले, फुरकान शेख, विशाल गवांदे, पोकॉ रोहित येमुल, रविंद्र घुगांसे, सागर ससाणे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ अर्जुन बडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीची तीन वेगवेगळी पथके तयार करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाब तात्काळ रवाना केले होते. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार फरार आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटवून नगर शहर परिसरात शोध घेत होते. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासताना आरोपी हे काळ्या रंगाची एमजी कार ( एमएच :१६ सीएक्स ९३९३) मधून अहमदनगर, शेवगांव, पैठण, बिडकीन मार्गे वाशिमकडे जाताना दिसल्याने पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास केला. यात वाशिम येथे जाऊन आरोपीचा शोध घेत असताना आरोपींची काळ्या रंगाची कार हॉटेल गुलाटीचे बाहेर उभी असलेली पथकस दिसली. पथकाची खात्री होताच हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या इसमाकडे कारबाबत विचारपुस करता त्याने कारमधील हॉटेलमध्ये राहण्यास आहेत, अशी माहिती प्राप्त झाल्याने हॉटेल रुममधील सर्वांना ताब्यात घेतले. त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे स्वप्निल रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हादराव हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कु-हे, सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे असे सांगितले. ताब्यातील संशयीताकडे अधिक विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना कार व त्यांचे मोबाईलसह ताब्यात घेतले.
दरम्यान एलसीबी एका टिम’ने इतर फरार आरोपींचा शोध घेत असताना आरोपी मिथुन धोत्रे हा रांजणी, बेल्हे ( ता. जुन्नर) येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने त्याला येथे जाऊन ताब्यात घेतले, त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे मिथुन सुनिल धोत्रे व एक विधीसंघर्षीत बालक असे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेतले.
आरोपी स्वप्निल शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द खुन, खुनासह जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा व इतर कलमान्वये गंभीर स्वरुपाचे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत.