Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात असा असेल निवडणूक कार्यक्रम
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नवीदिल्ली: महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. त्या निवडणुकीत भाजपा 105 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील एकसंध शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले होते. त्यानंतर राज्यात राजकारणातील आजवरचे महानाट्य पाहायला मिळाले. सुरुवातीला अडीच वर्ष काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता राज्यात होती. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याने राज्यात मविआचे सरकार कोसळले अन् नव्याने महायुती सरकारची सत्ता स्थापन झाली. त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापैकी राज्यात कोण सत्ता स्थापन करणार? हे पुढील महिन्यात स्पष्ट होईल.
👉महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार
दि.22 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरता येणार
दि.29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख
दि.30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होणार
दि.4 नोव्होंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
दि.20 नोव्होंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार
दि.23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार