;
पुरवठा अधिकारी शिकारे यांची कारवाई
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- स्वस्त धान्य दुकानातील मालात तफावत आढळून आल्या असता, नगर तालुक्यातील वाळकी येथील रेशन दुकान चालकावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. अरुण शिवाजी बोठे असे त्या रेशन दुकानचालकाचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील वाळकी येथील रेशनदुकानात दि.२६ मे ला पुरवठा अधिकारी वैशाली शिकारे यांनी
रेशन माला तपासणी केली असता, गहू-3691 किलो कमी ,तांदूळ -4473 किलो कमी,साखर – 67.5 किलो जास्त,मका- 236 किलो जास्त,चना डाळ -248 किलो कमी अशी तफावत रेशनमालात आढळून आली. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांना माहिती दिली. घटनास्थळी श्री सपोनि सानप यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल होऊन तेथील रेशनदुकानाचा पंचनामा केला. पुरवठा अधिकारी वैशाली शिकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुरनं व कलम 273/2021 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 3,अत्यावश्यक वस्तू अधिनियम 5 प्रमाणे रेशनदुकानदार अरुण बोठे याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1)पोलीस ठाणे-नगर ता पोस्टे
जिल्हा-अहमदनगर
2) गुरनं व कलम 273/2021 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 3,अत्यावश्यक वस्तू अधिनियम 5 प्रमाणे
3)फिर्यादीचे नाव – वैशाली गजानन शिकारे 35 वर्षे धंदा- नोकरी नेम – पुरवठा निरीक्षक अहमदनगर मोबा-9423805064.
4) आरोपीचे नाव-अरुण शिवाजी बोठे रा.वाळकी ताजी अहमदनगर
5) अप.घड.ता.वेळ ठिकाण – दि. 26/05/2021रोजी 16/00वा. वाळकी ता जि
अहदमनगर
6)अप.दाखलता.वेळदि.27/05/2021 रोजी 21/32वा
7) विलंबाचे कारण – फिर्यादीने आज रोजी फिर्याद दिल्याने
8) घटनास्थळ-वाळकी ता जि अहदमनगर
9) दिशा व अंतर -पश्चिमेस 20किमी
10) गुन्ह्याचे कारण- निल
11) आरोपी अटक ता वेळ- निल
12) आरोपी पुर्व इतिहास -निरंक
13) गेला माल-निरंक
14) मिळाला नाल -निल
15)तफावत झालेले मालाचे वर्णन-गहू-3691 किलो कमी ,तांदूळ -4473 किलो कमी,साखर – 67.5 किलो जास्त,मका- 236 किलो जास्त,चना डाळ -248 किलो कमी
16) भेट देणारे अधिकारी – सपोनि राजेंद्र सानप सो ,8689881000
पोसई आर राऊत सो नेम नगर तालुका पोस्टे. मोबा – 9561310320
दाखल अंमलदार-पोना – 1958 बी व्ही सोनवणे नेम नगर तालुका पो स्टे. 8888822688
तपासी अंमलदार – पोसई आर राऊत सो नगर तालुका पो स्टे. 9561310320
17) पो स्टे प्रभारी अधिकारी – सपो नि राजेंद्र सानप तो नगर तालुका पोस्टे 8605881000
हकीगत -वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी मजकुर हे पुरवठा निरीक्षक असून यातील आरोपी म//याचे वाळकी शिवारात स्वस्थ धान्य दुकान असून यातील दुकानातील स्वस्थ धान्य दुकानाचा पंचनामा केला असता त्यात सदरचे अन्न धान्य ह्यात तफावत व फेरफार केल्याचे आढळुन आल्याने सविस्तर पंचनामा करून पोस्ट्स आज रोजी फिर्याद दिल्याने गुन्हा राजी दाखल.