सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : इयत्ता १० वी आणि १२ वीच्या वर्गात फक्त परीक्षेसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांचा प्रवेश रोखण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी तालुका प्रशासनाकडे केली आहे. प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार श्याम वाडकर, गटशिक्षणाधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, ‘पैसे द्या अन् पाथर्डीत १० वी, १२वीला प्रवेश घ्या,निश्चिंत घरीच रहा सरळ परीक्षेला येऊन हमखास उत्तीर्ण व्हा,’ अशी हमी देणारे शिक्षणाचा बाजार मांडणारे दलाल, शैक्षणिक संस्था पाथर्डीमध्ये सर्रास कार्यरत आहेत. मागील शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेच्या वेळी केंद्रांवर दलाल फक्त परीक्षेसाठी प्रवेश देयाऱ्या संस्था चालकांचा आर्थिक लोभापाई मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ पहावयास मिळाला. अक्षरशः पोलीस ठाण्यापर्यंत तक्रारी आल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी विधानपरिषदेत या सर्व प्रकारावर तारांकित प्रश्न उपस्तीत करत सरकारला धारेवर धरले होते. तरी सुद्धा झोपलेल्या प्रशासनाला त्याचे सोयरसुतक नाही. नेमकच परीक्षेच्या वेळेस ,पावसाळी छत्री प्रमाणे पाथर्डी शहरात तसेच तालुक्यातील परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या जिल्ह्यातून राज्यभरातून काही प्रमाणात बाहेरील राज्यातून सुद्धा फक्त परीक्षेसाठी प्रवेश घेतलेले विदयार्थी अचानक दिसून येतात.
त्यामुळे ते वर्षभर कोठे राहतात,जेवणाची सोय कोठे असते .याबाबतीत संबंधित विभागाने कसलीही चौकशी करण्याची तसदी घेतलेली दिसत नाही. अनेक बेकायदेशीर हॉटेल,लोजिंग वर मोठ्या प्रमाणात हे विदयार्थी एकत्र राहतात .यामधून अत्याचारासारख्या घटनाही घडू शकतात आणि शहराचे वातावरण बिघडू शकते.या सर्व गोष्टी मुळे वर्षभर नियमित येणाऱ्या होतकरू स्थानिक मुलांचे नुकसान होत आहे. त्यामुळे याची चौकशी करावी तसेच येत्या पंधरा दिवसांमध्ये लेखी उत्तर द्यावे अन्यथा कुठलीही पूर्व सूचना न देता ,तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे गर्जे यांनी सांगितले आहे.