शिवराज्याभिषेक हा स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस – संभाजी कदम
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरापगड जातीच्या भूमीपूत्र मावळ्याच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध लढा सुरु केला. यामुळे गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मनातील आग स्वराज्याच्या प्रेरणेनं ज्वलंत झाली. विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले.शिवसेनेने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करत आहे, असे प्रतिपादन शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.
शिवराज्यभिषेक दिनानिमित्त शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक दत्ता कावरे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, संतोष गेनप्पा, संग्राम कोतकर, संदिप दातरंगे, सुरेश तिवारी, अरुणा गोयल, अण्णा घोलप आदि उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाले, स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवरायांना आदिलशाही, मुघलांशी लढा देताना स्वकीयांचाही सामना करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे जनता खर्या अर्थाने सुखी झाली. स्वराज्यात महिलांचे संरक्षण आणि सन्मान मिळत. प्रत्येकाला अभिमान वाटवा, अशीच शिवराज्यभिषेक सोहळा होता, असे सांगितले. यावेळी भगवान फुलसौंदर, शाम नळकांडे आदिंनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यातील प्रसंग सांगितले.