आदर्श गाव हिवरे बाजार येथे सुवर्णमहोत्सवी महाश्रमदानाचे आयोजन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :-
आदर्शगाव हिवरे बाजार येथे दि. १२ मे २०२३ रोजी सकाळी ठीक ७ ते ९ या वेळेत पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णमहोत्सवी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले. सन १९७२ साली आदर्शगाव हिवरे बाजार येथील पाझर तलाव क्रमांक १ चे काम करण्यात आले होते. त्यावेळेस लोकांना जागविण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरु झाली त्यातून पाझर तलावाचे काम झालेले आहे. लोकांना जगविणे एवढेच ध्येय असल्यामुळे जलसंधारणच्या दृष्टीने पाणी आडवा पाणी जिरवा या दृष्टीने न पाहिल्यामुळे पाझर तलावास गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते.

त्यानंतर हिवरे बाजार येथील पाझर तलाव क्रमांक १ ची वेळोवेळी ३ वेळा जिल्हाधिकारी व जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी समक्ष पाहणी करून तलाव फुटण्याचा धोका दर्शविला आणि नगर शहरापर्यंत त्याचा परिणाम होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. वेळोवेळी पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांनी पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री जलसंधारण योजनेतून सदर कामास मंजुरी मिळाली आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचे पाझर तलाव क्रमांक १ दुरुस्तीचे काम सन २०२३ मध्ये करण्यात आले. सदर तलावावर पिचिंग करण्याचे काम श्रमदानातून करण्यात आले.

श्रमदानासाठी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी तसेच ८२ वर्षाच्या वयोवृद्धापासून ते १२ वर्षाच्या चिमुकल्यापर्यंत अख्खा गाव श्रमदानाला सहभागी झाला होता, तसेच राज्याच्या आदर्शगाव योजनेतील गावातून सरपंच, ग्रामसेवक ,ग्रामकार्यकर्ता , संस्था अध्यक्ष ,संस्थेचा तांत्रिक कार्यकर्ता ,कृषी पर्यवेक्षक ,महिला पदाधिकारी,महिला बचत गट प्रतिनिधी ,अंगणवाडी सेविका हे सुध्दा श्रमदानात सहभागी झाले. पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १९८९ पासून हिवरे बाजार मध्ये आजपर्यंत गेली ३३ वर्षे अखंडपणे श्रमदान सुरूच आहे. श्रमदान आणि लोकवर्गणीतून मोठ्या प्रमाणावर उत्कृष्ट अशी गुणवत्तादायी विविध विकासकामे करण्यात आलेली आहेत.
श्रमदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी एम.बी.शेळके ,कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण विभाग जिल्हा परिषद पाडुरंग गायसमुद्रे , उपवनसंरक्षक सुवर्णा माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, उपअभियंता डी.के.ठुबे , तहसीलदार रमेश शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात उपस्थित होते. ( जिल्हाधिकारी म्हणाले:- 72 चा दुष्काळ आणि आजचे 2023 चे चिमुकले यांच्यातील समन्वय दिसून आला, तेव्हांची जाणीव आताच्या पिढीला करून दिली, पूर्वीच्या हालअपेष्टा यातना आताच्या पिढीला कळू देणे हेच खरे संस्कार … मुले मोबाईल लॅपटॉप मध्ये गुंतण्याऐवजी अशा श्रमदानाच्या उपक्रमांमुळे माणसे जोडले गेलीत . श्रमदानात महिला मोठ्या प्रमाणात दिसून आल्या .) हिवरेबाजार श्रमशक्तीचे आणि समन्वयातले मुर्तीमंत उदाहरण :- मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प आशिष येरेकर , महाराष्ट्र देशाला दिशा देते तसे हिवरेबाजार महाराष्ट्राला दिशा देते, हिवरेबाजार चे काम बघणे हा शिकण्याचा प्रत्यक्ष अनुभव, लोकांच्या शक्तीने, श्रमशक्तीने एकजुटीची ताकद दाखवून दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!