नगर तालुका पोलिस ठाणे : ट्रकचालकास लुटणारी टोळी पकडली

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
: रात्रीच्या वेळी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून ट्रकचालकास लुटणारी टोळी माहिती मिळताच पकडण्यात आली असून, या टोळीकडून घातक शस्त्रासह गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी नगर तालुका पोलीसांनी केली आहे. साई प्रदिप ठोसर (वय १९ रा. अमितनगर केडगाव ता. जि. अहमदनगर), शिवप्रसाद नारायन शिंदे (वय २२ रा. एकता कॉलनी केडगाव ता. जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि शिशीरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोउपनि युवराज चव्हाण, पोना बाळू कदम, पोकाँ कमलेश पाथरुट, पोकाँ विक्रांत भालसिंग, पोकाँ संभाजी बोराडे, पोकाॅ संदीप जाधव, चासफौ दिनकर घोरपडे, चापोकाँ विकास शिंदे आदिंच्या ‘टिम’ने ही कामगिरी केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, रविवारी दि.७ मे २०२३ला नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत वाळूज बायपास ते अरणगाव बायपास दरम्यान अरणगाव बायपासचे पुढे ब्रीजजवळून ट्रकचालक जात असताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर तिघांनी येऊन ट्रकसमोर दुचाकी आडवी लावली. दुचाकीवरून खाली उतरले. त्यापैकी एकाच्या हातात लोखंडी धारदार कोयता होता. त्याने तो कोयता मानेला लावून धमकावले. शर्टच्या खिशातील २ हजार रुपये काढून घेतले. त्यावेळी पाठीमागील ट्रकवरील दुसरा चालक राजा याने मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तेव्हा तेथे लोक जमा झाले. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात फोन आल्याने त्या ठिकाणी रात्रगस्त करिता असलेले अंमलदार गेले. तीन आरोपींपैकी दोन आरोपीना तेथे जमा झालेल्या ग्रामस्थांच्या मदतीन पोलीसांनी लुटमार करताना जागीच पकडले. आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव साई प्रदिप ठोसर ( रा. अमित नगर केडगाव ता. जि. अहमदनगर ), शिवप्रसाद नारायन शिंदे ( रा. एकता कॉलनी केडगाव ता. जि. अहमदनगर) असे सांगितले. त्यातील एकजण अंधाराचा फायदा घेऊन दुचाकीवर‌ बसून पळून गेला. पळून गेलेल्याचे पकडलेल्या दोघा आरोपींना नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव अक्षय साबळे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. रामवाडी ता. जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. व पकडण्यात आलेल्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या ताब्यात २० हजार रु. किंचे दोन मोबाईल, ५०० रुपये किंमतीची एक लोखंडी कत्ती व १ हजार ८०० रुपये रोख रक्कम असा एकूण २२ हजार ३०० रु. किं.चा मुद्देमाल पंचांसमक्ष जागीच जप्त करण्यात आला. या घटनेच्या अनुशंगाने नगर तालुका पोलीस ठाण्यात१२९३/२०२३ भा.द.वि. कलम ३९२,३४ आर्म ॲक्ट ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नगर तालुका पोलिस करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!