अहमदनगर क्राईम बुलेटिन

अहमदनगरला व्यापाऱ्यांवर चाकू हल्ला
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
Ahemnagar Crmie शहरातील मुख्य बाजारपेठ असणा-या कापडबाजारात दुकानासमोर बॅरिकेट लावल्याच्या कारणातून झालेल्या वादातून दोघा व्यापाऱ्यांवर एका जमावाने चाकू हल्ला करीत जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. Crime News या घटनेनंतर संतप्त व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून रूग्णालयात धाव घेतली. एसपी राकेश ओला, आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे संभाजी कदम यांच्या विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी जखमी व्यापाऱ्यांची भेट घेतली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील मुख्य मिरवणूक ही कापड बाजारातून जात असते. या मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कापड बाजारात काही ठिकाणी वाहतुकीच्या नियमनासाठी बॅरिकेट लावण्यात आले होते. घासगल्लीजवळ दीपक रमेश नवलाणी यांचे सिद्धी किडस कलेक्शन नावाचे दुकान आहे. या दुकानासमोर काही हातगाडी चालकांनी बॅरिकेट लावले. त्यामुळे त्यांच्या दुकानात ग्राहकांना जाण्यास अडथळा निर्माण झाल्याच्या कारणातून त्यांचे वादावादी झाली. या वादानंतर एक गटाने आणखी काही साथीदारांना बोलावून घेतले. या जमावातील एकाने दीपक नवलाणी यांच्यावर चाकूने वार करण्यास सुरूवात केली. त्यांच्या शेजारी ‘पॅरिस’ या दुकानाचे मालक प्रणील बोगावत मदतीसाठी आले.त्यांच्या ही हातावर चाकूचे दोन वार झाले. या घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले. व्यापाऱ्यांनी दीपक नवलाणी यांना सावेडीतील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रणील बोगावत यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

कोतवाली पोलिस ठाणे: कर्जदारास चौघांकडून मारहाण
Nagar Reporter
अहमदनगर
: व्यापाऱ्याला ५५ लाखांचे कर्ज स्वतःच्या नावावर घेऊन दिले. त्याला बँकेचे हप्ते भरण्यास सांगितले, या कारणाने त्याने चारजणांच्या मदतीने युवकाला जबर मारहाण केल्याची घटना अहमदनगर शहरातील बाजार समितीनजिकच्या पूनममोतीनगरमध्ये गुरुवारी (दि.१३) दुपारी १ ते २ वाजण्याच्या दरम्यान घडली.
नितीन दत्तात्रय चिपाडे (वय ४०, धंदा कांदा व्यापारी, रा. सारसनगर) यांनी बाजार समिती जवळील पुनममोतीनगर येथील व्यापारी अशोक देसर्डे यांना स्वतः व पत्नीच्या नावावर भारतीय स्टेट बँक, एमआयडीसी शाखेतून ५५ लाख रुपयांचे कर्ज २०१८- १९ मध्ये घेऊन दिले होते. या कर्जाचे हप्ते यांनी भरायचे ठरले होते. मात्र, बँकेत व्याजाचे हप्ते वेळेत न भरल्याने बँकेकडून एसएमएस तसेच संपर्क साधून कर्ज भरण्यास वारंवार सांगितले जाऊ लागले. त्यामुळे नितीन चिपाडे हे गुरुवारी अशोक देसरडा यांच्या पलक एजन्सी पूनममोतीनगर येथे गेले होते. त्यावेळेस तेथे असलेले महेंद्र उपाध्ये आणि मजरलाल तांबोळी यांच्यासह आणखी दोन जणांनी येथे कशासाठी आला, असे विचारले. त्यावेळेस कर्जाची रक्कम भरून घेण्यासाठी आलो, असल्याचे सांगितले. त्यानंतर महिंद्र उपाध्ये आणि तांबोळी यांच्यासह अनोळखी दोन अशा चौघांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे बेशुद्ध पडल्यावर चुलते सोमनाथ आणि लहान भाऊ तेजस यांनी उपचारासाठी आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या ठिकाणी अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोफखाना पोलीस ठाणे: तरुणीची छेड काढून तिला मारहाण
Nagar Reporter
अहमदनगर –
किराणा सामान घेऊन घराकडे जाणार्‍या तरुणीची रस्त्यात छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.१३) सायंकाळी ७ वाजता घडली. या घटनेबाबत रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, मारहाण कलमान्वये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.

सागर अशोक घोरपडे (रा. सिध्दार्थनगर) व त्याचा मेव्हणा यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी तरुणी गुरूवारी सायंकाळी तिच्या घराजवळ असलेल्या किराणा दुकानातून सामान घेऊन घराकडे जात असताना सागर घोरपडे व त्याच्या मेव्हुणाने तिला रस्त्यात अडविले. सागर तिला म्हणाला,‘तू कोठे गेली होती’, त्यावर फिर्यादीने,‘तुला काय करायचे मी कुठेही जाईल’ असे म्हणताच सागर व त्याच्या मेव्हुणेला राग आला. त्यांनी फिर्यादी तरुणीसोबत भर रस्त्यात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तिला मारहाण केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार गणेश चौधरी करीत आहेत.

तोफखाना पोलीस ठाणे : बंद घर फोडून दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरी
Nagar Reporter
अहमदनगर :
शहरातील कल्याण रोडवरील गणेशनगरमधील बंद घर चोरट्यांनी फोडून दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने व ३० हजार ७०० रूपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. दि.११ एप्रिल रोजी दुपारी साडे तीन ते दि.१३ एप्रिल रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान घटना घडली आहे.
या प्रकरणी सुशिल बबन काटे (वय३५) यांनी दि.१४ एप्रिल रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान घरफोडीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, उपनिरीक्षक आढाव यांनी घटनास्थळी भेट दिली असून गुन्हे शोध पथकाला तपासाबाबत सुचना केल्या आहेत. सुशिल काटे यांनी त्यांचे राहते घर दि.११ एप्रिल रोजी दुपारी साडे तीन वाजता बंद केले होते. ते बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील सामानांची उचकापाचक करून साडे पाच ग्रॅमची अंगठी, एक तोळ्याचे मंगळसूत्र, साडे पाच ग्रॅमचे झुंबे, बाळी, नथ असे सुमारे दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने व ३० हजार ७०० रूपये रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. दि.१३ एप्रिल रोजी सकाळी पावणे अकरा वाजता घरफोडीचा प्रकार लक्ष्यात आला. त्यानंतर सुशिल काटे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अंमलदार योगेश चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

कोतवाली पोलिस ठाणे : सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याच्या अडीच लाखांची चोरी
Nagar Reporter
अहमदनगर :
जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे अडीच लाख रूपये एस.टी. बस प्रवासा दरम्यान चोरीला गेले. चिचोंडी पाटील ते अहमदनगर शहरातील चांदणी चौका दरम्यान ही घटना घडली.
या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाजी खांदवे यांनी चिचोंडी पाटील येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतून कुटुंबीयांच्या नावावर पीक कर्ज घेतले होते. पीक कर्जाची रक्कम ६ लाख ८२ हजार ५०० रूपये रक्कम कापडी पिशवीमध्ये ठेवून अहमदनगरला येण्यासाठी बस थांब्यावर थांबले होते. अहमदनगरया येणाऱ्या बसमध्ये बसत असताना त्यांच्या समवेत तीन महिला एका लहान मुलासह बसल्या होत्या. खांदवे यांच्या कापडी पिशवीतून प्रवासा दरम्यान, ५० हजार रूपये किंमतीचे पाच बंडल चोरीला गेले. या महिला चांदणी चौकात उतरल्या. खांदवे हे अहमदनगरला आल्यावर त्यांच्या पिशवीतील रक्कम कमी आढळून आली. त्यांनी तात्काळ रिक्षा करून चांदणी चौकात येऊन पाहणी केली असता, या तीन महिला गायब झालेल्या होत्या. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात तीन महिलांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली पोलिस ठाणे : सोने खरेदीच्या बहाण्याने चोरी
Nagar Reporter
अहमदनगर
: सोने खरेदीच्या बहाण्याने २० हजार रूपयांची बांगडी चोरण्यात आली. शहरातील जुना कापड बाजार रस्त्यावरील शिंगवी ज्वेलर्समध्ये सोमवारी (दि. १०) दुपारी २ वाजता ही घटना घडली.
जुना कापड बाजार रस्त्यावर शिंगवी ज्वेलर्स प्रा.लि. नावाचे सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. या दुकानात बुरखा घातलेली एक महिला सोमवारी (ता.१०) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आली. तिने सोन्याच्या बांगड्या खरेदीचा बहाणा केला. दुकानातील सेल्समन नीलेश पोपटराव कुलथे (वय ३७) यांनी ८ वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या दाखविल्या. त्यावेळेस या महिलेने नजर चुकवून २ ग्रॅम ४४० वजनाची एक सोन्याची बांगडी नजर चुकवून चोरली. ही घटना उशिरा लक्षात आली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डची तपासणी केल्यावर ही चोरी लक्षात आली. नीलेश कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात बरखा घातलेल्या महिलेविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोफखाना पोलीस ठाणे : बंद घर फोडून दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरी
Nagar Reporter
अहमदनगर :
शहरातील कल्याण रोडवरील गणेशनगरमधील बंद घर चोरट्यांनी फोडून दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने व ३० हजार ७०० रूपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. दि.११ एप्रिल रोजी दुपारी साडे तीन ते दि.१३ एप्रिल रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान घटना घडली आहे.

या प्रकरणी सुशिल बबन काटे (वय३५) यांनी दि.१४ एप्रिल रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान घरफोडीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, उपनिरीक्षक आढाव यांनी घटनास्थळी भेट दिली असून गुन्हे शोध पथकाला तपासाबाबत सुचना केल्या आहेत. सुशिल काटे यांनी त्यांचे राहते घर दि.११ एप्रिल रोजी दुपारी साडे तीन वाजता बंद केले होते. ते बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील सामानांची उचकापाचक करून साडे पाच ग्रॅमची अंगठी, एक तोळ्याचे मंगळसूत्र, साडे पाच ग्रॅमचे झुंबे, बाळी, नथ असे सुमारे दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने व ३० हजार ७०० रूपये रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. दि.१३ एप्रिल रोजी सकाळी पावणे अकरा वाजता घरफोडीचा प्रकार लक्ष्यात आला. त्यानंतर सुशिल काटे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अंमलदार योगेश चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याच्या अडीच लाखांची चोरी
Nagar Reporter
अहमदनगर
: जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे अडीच लाख रूपये एस.टी. बस प्रवासा दरम्यान चोरीला गेले. चिचोंडी पाटील ते अहमदनगर शहरातील चांदणी चौका दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
.
सोनाजी खांदवे यांनी चिचोंडी पाटील येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतून कुटुंबीयांच्या नावावर पीक कर्ज घेतले होते. पीक कर्जाची रक्कम ६ लाख ८२ हजार ५०० रूपये रक्कम कापडी पिशवीमध्ये ठेवून अहमदनगरला येण्यासाठी बस थांब्यावर थांबले होते. अहमदनगरया येणाऱ्या बसमध्ये बसत असताना त्यांच्या समवेत तीन महिला एका लहान मुलासह बसल्या होत्या. खांदवे यांच्या कापडी पिशवीतून प्रवासा दरम्यान, ५० हजार रूपये किंमतीचे पाच बंडल चोरीला गेले. या महिला चांदणी चौकात उतरल्या. खांदवे हे अहमदनगरला आल्यावर त्यांच्या पिशवीतील रक्कम कमी आढळून आली. त्यांनी तात्काळ रिक्षा करून चांदणी चौकात येऊन पाहणी केली असता, या तीन महिला गायब झालेल्या होत्या. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात तीन महिलांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली पोलिस ठाणे : सोने खरेदीच्या बहाण्याने चोरी
Nagar Reporter
अहमदनगर :
सोने खरेदीच्या बहाण्याने २० हजार रूपयांची बांगडी चोरण्यात आली. शहरातील जुना कापड बाजार रस्त्यावरील शिंगवी ज्वेलर्समध्ये सोमवारी (दि. १०) दुपारी २ वाजता ही घटना घडली.
जुना कापड बाजार रस्त्यावर शिंगवी ज्वेलर्स प्रा.लि. नावाचे सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. या दुकानात बुरखा घातलेली एक महिला सोमवारी (ता.१०) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आली. तिने सोन्याच्या बांगड्या खरेदीचा बहाणा केला. दुकानातील सेल्समन नीलेश पोपटराव कुलथे (वय ३७) यांनी ८ वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या दाखविल्या. त्यावेळेस या महिलेने नजर चुकवून २ ग्रॅम ४४० वजनाची एक सोन्याची बांगडी नजर चुकवून चोरली. ही घटना उशिरा लक्षात आली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डची तपासणी केल्यावर ही चोरी लक्षात आली. नीलेश कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात बरखा घातलेल्या महिलेविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!