संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : येथे तीन चैनस्नॅचिंग गुन्ह्यातील सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले. त्या आरोपीकडून तिन्ही गुन्ह्यांतील मुद्देमाल शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. साहिल उर्फ मिंडा बाबासाहेब पिंपळे (वय २५ रा अशोकनगर ता. श्रीरामपुर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर व शिर्डी डिवायएसपी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस ठाण्याचे पोनि नंदकुमार दुधाळ यांच्या सूचनेनुसार पोना गडाख, पोकाॅ शेलार, पोकाॅ अंधारे व पोकाॅ विरदवडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत होणा-या चैनस्नॅचिंग (सोन साखळी चोरी) करणा-या आरोपींचा शोध घेवून कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधिक्षक सो अहमदनगर यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे श्री नंदकुमार दुधाळ, पोलीस निरीक्षक शिर्डी, पोलीस स्टेशन यांनी शिर्डी शहरात वेगवेगळ्या ठीकाणी व वेगवेगळ्या वेळी नाकाबंदी व गस्त घालुन कारवाई कारवाई करणेबाबात आदेशीत केले होते. शिर्डी शहरातील चैनस्नॅचिंग आरोपीतांचा शोध चालु होता. त्या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशन मधील पाहीजे आरोपी साहिल उर्फ मिंडा बाबासाहेब पिंपळे वय 25 वर्षे रा अशोकनगर ता. श्रीरामपुर यास छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज पोलीस स्टेशन येथे अटक असताना सदर आरोपीस शिर्डी पोलीस स्टेशन च्या गुन्ह्यामध्ये वर्ग करुन पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असताना तपासादरम्यान आरोपी साहिल उर्फ मिंडा बाबासाहेब पिंपळे याने शिर्डी मधील तीन गुन्हे केल्याचे कबुली दिली व चोरी केलेले 7 ग्रॅम, 8 ग्रॅम व 10 ग्रॅम वजनाचे एकुण 25 ग्रॅम व 1,50,000 रु किमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी याकडुन शिर्डी पोलीस स्टेशन मधील पुढील गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेल्या गुन्हे 1) शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 611/2022 भा.द.वि कलम 394, 34 प्रमाणे. 2) शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 616/2022 भा.द.वि कलम 394, 34 प्रमाणे, (3) शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 636/2022 भा.द.वि कलम 394, 34 प्रमाणे,
शिर्डी पोलीस ठाणेद्वारे शिर्डीत येणा-या साई भक्तांना व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपआपली सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवून गर्दीच्या ठाकाणी यावे व कोणालाही संशयीत ईसम किंवा विना नंबर प्लेट मोटारसायकल आढळून आल्यास शिर्डी पोलीस स्टेशनचा फोन नं. 02423-255133 यावर संपर्क साधावा.
पोलिस निरीक्षक
पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस ठाणे