संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भिंगार येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत एकास जबर मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांविरुध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश पेंडुलकर, सोनु पेंडुलकर (दोघे रा.ब्राह्मणगल्ली, भिंगार), अक्षय हंपे (रा.सौरभनगर , भिंगार), अभी शेलार (या.भिमनगर, भिंगार), रोहित शिर्के (रा.पाटीलगल्ली, भिंगार), आन्या उर्फ आनंद नायकू (रा.नेहरुचौक, भिंगार, अहमदनगर) आदि सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.११ एप्रिल २०२३ ला रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भिंगार अमरधामजवळ सहाजणांनी गैरकायद्याची मंडळी जमावून मिरवणुकीत नाचताना धक्का लागला, या कारणांमुळे शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने,लोखंडी रॉडने मारहाण केली, या अविष्कार संजय पुंड (रा.नागरदेवळे जुने ग्रामपंचायतजवळ) यांच्या फिर्यादीवरून तसेच जिल्हाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरनि २१०/२०२३ भादविक १४३, १४७, १४८,१४९,३२४,३२३,५०४,सह म.पो.का.क.३७(१)(३)/१३५ प्रमाणे सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील कारवाई एसपी राकेश ओला, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि डि.एस.मुंडे यांच्या सूचनेनुसार पोना आर.टी.गोरे हे करीत आहेत.