संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भिंगार शहर भारतीय जनता पार्टी व भाजपा महिला आघाडीच्या वतीने महात्मा फुले जयंती निमित्ताने भिंगार अर्बन बँकनजिकच्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास माजीमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पुष्पहार घालून (दि.११) सकाळी १०वा. अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव दहीहंडे, महिला आघाडी अध्यक्ष ज्योत्स्नाताई मुंगी, नगरसेविका शुभांगीताई साठे, केलास गव्हाणे, सुरेश तनपुरे, अनंत रासने, आनंद बोथरा, गणेश साठे, अंबादास घडसिंग, अजय देवकुळे, सचिन फिरोदिया, नगर शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदे आदिंसह भिंगार भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.