संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहाता : तालुक्यातील रांजणगांव खा. येथील भारत संचार निगम लिमिटेड टेलीफोन एक्सचेंज मधील बॅटरी चोरी करणा-या ३ चोरट्यांना पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून १६ बॅट-या व पिकअप असा एकूण ५ लाख २५ हजार ६०० रु.चा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
लुकमान इसाक शहा (वय २२, रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर), वसीम गफार शेख (वय २२, रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर) व राजीक असिक पठाण (वय २९, रा. काझीबाबा रोड, वॉर्ड नं. २, ता. श्रीरामपूर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शिर्डी डिवायएसपी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार सपोनि हेमंत थोरात, पोहेकॉ मनोहर गोसावी, पोकाॅ सागर ससाणे, मयुर गायकवाड, रोहित येमुल, जालिंदर माने व चापोहेकॉ बबन बेरड आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
गणेशनगर जिल्हा परिषद शाळेसमोर, रांजणगांव खा, (ता. राहाता) येथे असलेले बीएसएनएल टेलीफोन एक्सचेंजचे खोलीचा कडीकोयडा तोडून आत प्रवेश करुन खोलीतील २५ हजार ६०० रुपये किंमतीच्या १६ स्क्रॅप बॅट-या अनोळखींनी चोरुन नेल्या, या योगेश चंद्रकांत झाडीकर ( नोकरी, रा. बीएसएनएल स्टाफ क्वॉर्टर, ता. राहाता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९९२ / २०२३ भादविक ४५४, ४५७, ३८० प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.