👉महिला उद्योजक प्रियंकाताई यांचा समाजासमोर मोठा आदर्श :विद्याताई पवळे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर –पुणे महामार्गावरील सुपा एमआयडीसीमध्ये वल्ड ऑफ वुड नावाने प्रियंकाताई शिंदे यांनी ओरीजनल सागवान डम्पोडेट खबर बुड लाकडापासुन स्टाइलमध्ये नवीन,नवीन डिझायनर बनवणारा कारखाना सुरु केला. तो अल्पावधीतच उत्तम गुणवत्ता ठेवत मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे अल्पावधितच त्यांच्या कामाचा मोठा विश्वास निर्माण केल्यामुळे ग्राहकांचा मोठा प्रतिसाद आज ग्रामीण भागात मिळत महिला उद्योजकता हे राष्ट्र उभारणीचे प्रभावी माध्यम असुन विद्याताई पवळे यांनी नारायणगव्हाणसह पंचक्रोशितील महिलांच्या हाताला काम मिळावे. महिला उद्योजकता वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू व विकासाची गंगा ग्रामीण भागात उभी करण्यासाठी आपण लवकरच महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेऊ, यासाठी आपले मार्गदर्शन मोलाचे राहील असे सौ. प्रियंकाताई राहुल शिंदे यांच्याशी सौ. विद्याताई शरद पवळे यांनी सत्कार प्रसंगी बोलताना मत व्यक्त केले. यावेळी प्रियंकाताईंनी सोबत काम करण्यास आनंद वाटेल असे बोलत विद्याताईंना धन्यवाद व्यक्त केले.