संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शहरातील मुकुंदनगर येथे दुचाकी चोरणारा चोरटा पकडून त्याच्याकडून चोरलेल्या दुचाकी जप्त करण्याची कारवाई तोफखाना पोलिसांनी केली आहे. शेख अजरुद्दीन महेबुब ऊर्फ पेंटर (वय ३०, रा मुकुंदनगर अहमदनगर) यास ताब्यात घेतले आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिस ठाण्याचे पोनि मधुकर साळवे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे पोसई समाधान सोळंके, पोहेकाॅ दत्तात्रय जये, सुनिल शिरसाट, पोना सुरज वाबळे, पोना वसीम पठाण, पोना अहमद इनामदार, पोना संजय इरनक, पोना अविनाश वाकचौरे, पोकाॅ सचिन जगताप, पोकाॅ सतीष भवर, पोकाॅ शिरोप तरटे, हरिदास कोतकर, संदिप गि-हे, पोकाॅ सतीष त्रिभूवन आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
आरोपी शेख अजरुद्दीन महेबुब ऊर्फ पेंटर( वय ३० वर्षे रा मुकुंदनगर अहमदनगर) यांच्याकडे चोरलेल्या दुचाकी तोफखाना पोलिसांना मिळाल्या आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात 👉 १) गु.र.नं- ३९४ /२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे १ लाख २० हजार रू किंमतीची काळ्या रंगाची त्यावर निळे पट्टे असलेली हिरो होड़ा कंपनीची सप्लेंडर दुचाकी ( एमएच १४ ए डब्लू ४४४९) असा असलेली चेसी नंबर ०६G२६२२००९ इंजिन नंबर०६G१५२०२३५ 👉२) गु.र.नं १९ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे १ लाख ५० हजार रु किमतीची फिक्कट पिवळे रंगाची एक रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट दुचाकी बिना क्रमांकाची जुनी वापरती चेसी नंबर ME३U३S५०२KL ७५६९१४ इंजिन नंबर UBS५८२KL६८९७२२ 👉३) गु.र.नं १९१०/२०२२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे ३ लाख ४० हजार रु दुचाकी (एम एच १७ CF ३५६५) चेसी नंबर MLBHR०५१५००२३२ इंजिन नंबर HA११EPJ५००२२१ या चोरीच्या दुचाकी आरोपीने काढून दिल्या आहेत.
हिंदूराष्ट्रसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
Nagar Reporter 👉अहमदनगर : रामनवमीच्या मिरवणुकीत मोठ्या आवाजात डी.जे. लावल्याबद्दल हिंदू राष्ट्रसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू राष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर लक्ष्मण गेंट्याल यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज महाजन यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गर्गे, योगेश भिंगारदिवे, कैलास शिरसाठ, योगेश खामकर, उमेश शेरकर हे दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत गस्त घातली जात होती. हिंदू राष्ट्रसेनेच्या मंडळाने डी.जे.वर कर्णकर्शक आवाजात डी.जे.वर गाणे लावण्यात आले होते. शासकीय पंच गणेश अशोक कवडे (वय ३८, रा. श्रीरामपूर, नेमणूक लघु पाटबंधारे विभाग) कविता यशवंत लोखंडे (वय ३९, रा. अहमदनगर, मुळा पाटबंधारे विभाग) यांच्या समक्ष ध्वनीमापन यंत्रावर आवाजाची पातळी मोजण्यात आली. माळीवाडा भागातील फुलसौंदर मळा येथे सायंकाळी साडे चार वाजता आवाजाची पातळी मोजली असता ११० डेसीबल होती. त्यानंतर पंचपीर चावडी येथे सायंकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी मोजणी केल्यास १०४ डेसीबल होता. ध्वनी पातळीचा पावती दिली असता, मंडळ आणि डी.जे. चालकांनी ही पावती स्वीकारण्यास नकार दिला.
गोपनीय शाखेचे पोलिस अंमलदार उमेश दगडू शेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंदू राष्ट्रसेना मंडळाचे अध्यक्ष संजय पांडूरंग आडोळे, डी.जे. मालक विजय मोहन जगताप, मंडळाचे अहमदनगर अध्यक्ष दिगंबर गेंट्याल, राहुल मोहन गायकवाड यांच्यावर पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, ध्वनी प्रदूषण (नियम आणि नियंत्रण) नियम २००० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज वितरणचा सहायक अभियंता लाचेच्या सापळ्यात
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याच्या संशयातून तपासणीसाठी घेतले. पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ५० हजार रूपयांची मागणी केली. प्रत्यक्षात तडजोडीअंती ३० हजार स्वीकारण्याची तयारी दर्शविणारा वीज वितरणचा सहायक अभियंत्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक अभियंता कमलेश युवराज पवार (वय२९, हल्ली रा. सावेडी, अहमदनगर, मूळ रा.प्लॉट न १२०, सी २ भवनच्या पाठीमागे, खुटवडनगर, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
अंभोरा (ता. आष्टी) येथे आंबेश्वर कृषीवन पर्यटन हे रिसॉर्ट आहे. या ठिकाणी त्यांनी महावितरण अहमदनगर शाखा चिचोंडी पाटील (ता.नगर), यांच्याकडून विद्युत जोडणी घेतली आहे. त्यांच्या वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याच्या संशयातून सहायक अभियंता कमलेश युवराज पवार यांनी मीटर तपासणीसाठी काढून घेतले. त्यानंतर पुन्हा वीज जोडणी पूर्ववत देण्यासाठी वरिष्ठ उपअभियंता कोपनर यांच्याकरिता ५० हजारांची मागणी केली. आंबेश्वर कृषीवन पर्यटन चालक यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिस उपअधीक्षक हरिश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे आणि सहाय्यक सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक शरद गोरडे यांनी ता. २४ मार्च २०२३ रोजी चिचोंडी पाटील गावात सापळा लावला. सहायक अभियंता कमलेश पवार यांनी तडजोडीअंती ३० हजार रूपयांची लाच स्वीकारून वीज जोडणी पूर्ववत करण्याची तयारी दर्शविली. पंचासक्षम केलेल्या मागणीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात गुरूवारी (ता.३०) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.