
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नव्याने हजर झालेले नगर तालुका तहसीलदार संजय शिंदे यांचा नगर तालुका बाळासाहेबांची शिवसेनेचे नगर तालुका उपप्रमुख दामोदर भालसिंग यांनी नुकताच शाल,श्रीफाळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे अतुल भालसिंग, जितेंद्र कासार, तात्याराव भालसिंग, सुभाष काकडे आदिंसह नगर तालुक्यातील शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी दामोदर भालसिंग यांनी तहसीलदार संजय शिंदे यांना सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा, तसेच ऐतिहासिक नगर शहरासह नगर तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण योग्य ते कार्यवाही करावीत, अशी मागणीही केली.
