डोंगर पट्ट्यातील गरीब, होतकरू मुलांना शिक्षण सुविधा व्हावी, म्हणूनच ढाकणे साहेबांनी शाळा सुरू केल्या : जि.प.प्रभावती ढाकणे

👉श्री वामनभाऊ विद्यालयामध्ये शालेय वार्षिक बक्षीस वितरण उत्साहात
सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी :
पूर्वी शिक्षणाची सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील विशेषतः डोंगर पट्ट्यातील गरीब व होतकरू मुलांना शिक्षणासाठी सुविधा व्हावी, म्हणूनच ढाकणे साहेबांनी शाळा सुरू केल्या, असे प्रतिपादन जि.प.सदस्या प्रभावती ढाकणे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील श्री वामनभाऊ विद्यालयामध्ये शालेय वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य दिलीप गोरे, एकलव्य शिक्षण संस्थेचे समन्वयक एस.पी.तुपे, मा.नगराध्यक्ष रत्नमाला उदमले, आरतीताई निर्हाळी, सरपंच आदिनाथ बडे पा, जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक सापते सर, डॉ राजेंद्र खेडकर, गोविंद बडे, नवनाथ सातपुते, मीरा बडे, अश्विनी साळुंके, मीना पालवे, मंगल वायभासे, शिवाजी गीते, त्रिंबक कराड, विद्यार्थी सर्व शिक्षक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.


या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक, कला, क्रीडा,वक्तृत्व स्पर्धा व शैक्षणिक क्षेत्रातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे वार्षिक बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थीनी लिहिलेल्या निवडक लेख, कविता यांचे संपादन करत अंकुर हस्तलिखित चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
साधारणत: शाळेतील ७० विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.यावेळी श्री तुपे यांनी विदयार्थ्यांना थॉमस एडिसन याचें उदाहरण देऊन तुम्हीही जीवनात कितीही वेळा संकटे आली तरी हार न मानता जीवनामध्ये आगेकूच करत राहावी असा मौलिक सल्ला देत मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे श्री गोरे यांनी विद्यार्थ्यांना अवांतर वाचन करावे त्यातून आपला भौतिक विकास होण्यास मदत होते असे बोलतांना सांगितले.
सौ प्रभावती ढाकणे यांनी विद्यार्थांचे कौतुक करतांना म्हटले की शाळेतील मुलींची संख्या व प्रगती पाहून आपण भारावून गेले आहे. विद्यालयाने केलेल्या अंकुर हे प्रयोजन खूपच उत्कृष्ट नमुना आहे. या परिसरातील विदयार्थी अनंत अडचणीवर मात करून ज्ञानार्जन करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे.

येथील विद्यालयाचे मुख्याद्यापक, शिक्षक यासाठी मेहनत घेत आहेत हे कौतुकस्पद आहे.
विविध स्पर्धामध्ये बारगजे कृष्णा, गोकुळ बडे, प्रतीक्षा वणवे,राजगुरू साक्षी, राजगुरू धनंजय, नागरगोजे अनिल, ढाकणे कांचन, ढाकणे मीरा, सृष्टी बडे, मोहिनी बडे, आरती बडे, वैष्णवी वाघमारे, बारगजे कृष्णा, ओमकार बडे,केदार आदित्य, पालवे प्रतीक्षा, ढाकणे भगवान, बडे ज्ञानेश्वरी आदी विद्यार्थांनी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रसह बक्षिसे मिळवले.
सूत्रसंचालन शिक्षिका आशा गर्जे व सनी मर्दाने सर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक कैलास नरोडे यांनी केले. वार्षिक अहवाल वाचन सोमनाथ जाधव यांनी केले. आभार बाळासाहेब दहिफळे यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!