संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : मंगळसूत्र चोरीच्या दाखल गुन्ह्याचा तपास करून संबंधित फिर्यादीस ते पुन्हा मिळवून देण्याची कामगिरी अहमदनगर एलसीबी व कोतवाली पोलिसांनी मिळवून केली. हस्तगत मुद्देमाल फिर्यादीस कोतवाली पोलिसांनी परत ताब्यात दिला, या पोलिसांच्या कामगिरीचे फिर्यादीने समाधान व्यक्त करीत धन्यवाद मानले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११०२३/२०२२ भा.द.वि.क. ३९२, ३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील मंगळसूत्र चोरी (चैन स्नॅचिंग) ही फिर्यादी यांच्या घरासमोर करुन आरोपी हा फरार झाले होते. या चैन स्नॅचिंग झालेले गुन्ह्यातील मंगळसूत्र चोर रियाज फय्याज इराणी (रा. वार्ड नं. 1 श्रीरामपूर) व त्याचा साथीदार यांना
पकडून गुन्ह्यातील मुद्देमाल अहमदनगर एलसीबी टिम’ने हस्तगत केले होते. यानंतर या गुन्ह्याचा अधिक तपास कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या आदेशान्वये पोउपनि सुखदेव दुर्गे यांनी केला. या तपासात जप्त मुद्देमाल ४० हजार रू.चे एक सोन्याचे मंगळसूत्र अर्धवट तुटलेल वजन अंदाजे ९ ग्रॅम हा सर्व मुद्देमाल नाशिक आयजी बी. जी शेखर, अहमदनगर एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मुद्देमाल हा कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते फिर्यादी तथा मूळ मालक संजय सदाशिव साठे (वय ४७ रा. घर .नं.१३ ईशान अपार्टमेन्ट कुंभारगल्ली नालेगांव अहमदनगर) यांना कायदेशीर कार्यवाही करुन ताब्यात दिले. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पोहेकॉ साबळे, पोकॉ रामनाथ हंडाळ हे उपस्थित होते. या कोतवाली पोलिसांच्या कामगिरीवर फिर्यादी संजय सदाशिव साठे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पोनि चंद्रशेखर यादव व सर्व पोलीस अधिकारी, पोलीस टीमचे आभार मानले.