सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : कांदा , कापूस , वीज तोडणे , सिलेंडर दरवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने, या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी येथील प्रांताधिकारी कार्यालयाला कापसाचे व कांद्याचे तोरण बांधून कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय या महामार्गावर सत्ताधारी भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सोमवारी (दि.६) रस्तारोको आंदोलन केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी यावेळी गळ्यात कांदा व कापसाच्या माळा घालून सत्ताधारी भाजपावर महागाई व शेतकऱ्यांच्या मालास हमीभाव मिळत नसल्याने संतप्त व्यक्त केला. यावेळी सुमारे एक ते दीड तास दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आक्रोश केला.अतिवृष्टीचे मागील वर्षीचे राहिलेले गावातील तसेच यावर्षीचे थकीत अनुदान त्याचप्रमाणे कांदा, ऊस, तूर, कापूस सह विविध पिकांना हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांचे शेती पपंचे वीज कनेक्शन कट करू नये , गॅस सिलेंडरच्या किंमती कमी कराव्यात आली मागण्यां यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनात यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे , माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे , राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बापू बोरुडे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाअध्यक्ष उद्धव केदार, नितीन बारगजे, डॉ राजेंद्र खेडकर, डॉ.अशोक बडे, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान दराडे , काँग्रेस तालुकाध्यक्ष नाशिर शेख, अनिल ढाकणे, राजेंद्र बोरुडे, देवा पवार, वैभव दहिफळे, बाळासाहेब दराडे, गणेश वायकर, महादेव दहिफळे, अनिल बंड , पप्पू शिरसाट, आरती निराळी, माजी नगराध्यक्ष रत्नमाला उदमले आदीसह पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व विशेषतः नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान तहसीलदार श्याम वाडकर यांनी नागरिकांनी केलेल्या संतप्त मागण्याबाबत सकारात्मक विचार करून त्या शासन दरबारी मांडण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
पाथर्डी पोलिस ठाण्याचे सपोनि प्रवीण पाटील, सपोनि ज्ञानेश्वर कांयदे , पोउपनि सचिन लिमकर आदिंसह पोलिस कर्मचाऱ्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.