‘महानंद’च्या अध्यक्षपदी राजेश परजणे; उपाध्यक्ष रामकृष्ण बांगर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे रामकृष्ण बांगर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ महानंद डेअरीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा चिंचपूर पांगुळ, पांढरवाडी ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी चिंचपूर पांगुळचे चेअरमन, प्रगतीशील शेतकरी पोपटराव बडे पा., आर.के.बडे पा.,पांढरवाडीचे चेअरमन राजेंद्र पाचपुते, मनोज पोकळे, राजेंद्र पोकळे, अशोक पोकळे, प्रशांत पोकळे, विजय पोकळे, शुभम पोकळे, दादासाहेब पवार, तुका मोठे आदिंनी सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) या सहकार व दुग्ध व्यवसायातील शिखर संस्थेच्या अध्यक्षपदी राजेश परजणे- पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदावर रामकृष्ण बांगर यांना संधी मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालक मंडळाची (महानंद) मुंबईतील गोरेगाव येथे दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यात अध्यक्ष व उपाध्यक्षदाच्या निवडी झाल्या. अध्यक्षपदासाठी राजेश परजणे- पाटील यांचा व उपाध्यक्षपदासाठी रामकृष्ण बांगर यांचा एकमेव अर्ज आला. संचालक विनायकराव पाटील, वैभव पिचड यांनी परजणे यांच्या निवडीचा ठराव मांडला. त्यानंतर परजणे व बांगर यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले. निवडीनंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी परजणे, बांगर यांचा सत्कार केला. राजेश परजणे हे नगर जिल्ह्यातील नावाजलेल्या गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील कोपरगाव तालुका दूध संघाचे अध्यक्ष आहेत. तर बांगर हे पाटोदा तालुका दुध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष आहेत.
“केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन दुध व्यवसाय, सहकाराला बळकटी देण्याचा प्रयत्न, तालुका व जिल्हा संघाना ताकदा देण्यासाठी आणि खासगी व सहकारी संघासाठी एकच धोरण कसे आणता येईल, यासाठी पाठपुरावा करणार आहे,” अशी प्रतिक्रिया नूतन अध्यक्ष श्री. परजणे यांनी दिली.