जिल्ह्यातील येळीसह १४ ग्रामपंचायतीस आर.आर.(आबा)पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर
👉जिल्हास्तरीय ग्रामपंचायत संवत्सर (कोपरगाव)व थेरगाव (कर्जत) यांना प्रथम क्रमांक विभागून
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर -: राज्यात आर.आर.(आबा)पाटील यांच्या नावाने दिला जाणारा २०२१-२२चा मानाचा आर.आर.(आबा)पाटील सुंदर गाव पुरस्कार जिल्हास्तरीय ग्रामपंचायत संवत्सर (कोपरगाव)व थेरगाव (कर्जत) यांना प्रथम क्रमांक विभागून आणि तालुकास्तरावर अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतीस नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील येळी या गावासह १४ ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये व मानचिन्ह असे आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील गावे याप्रमाणे बाभळेश्वर (ता.राहाता), वडुले बु. (ता, शेवगाव), विरगाव (ता.अकोले), वेल्होळे(ता.संगमनेर), संवत्सर (ता.कोपरगाव), बेलापूर बु.व उंदरीगाव विभागातून (ता.श्रीरामपूर), तांदूळनेर(ता.राहुरी), खुपटी (ता.नेवासा), मोहरी(ता.जामखेड), थेरगाव (ता.कर्जत), निमगाव खलू (ता.श्रीगोंदा), मांडवे खुर्द (ता.पारनेर), कोल्हेवाडी(ता.नगर) आदी गावांना आर.आर.पाटील यांच्या नावाने दिला जाणारा स्मार्ट ग्राम पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कार गावांची यादी नुकतीच अहमदनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जाहीर केली आहे.