‘व्हॉटसॲप’वरुन प्रेमाच्या जाळ्यात, युवतीने केले ब्लॅकमेल ; अ.नगर जिल्ह्यातील घटना

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
व्हॉटस ॲप व इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या २१ वर्षीय युवतीने राहुरी येथील एका ४० वर्षीय व्यापाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर त्याच्याशी जवळीक साधून त्याला एका लॉजवर बोलावून त्याच्या बरोबर नको त्या अवस्थेत फोटो व व्हिडिओ शुटींग केले. युवतीने त्या फोटोच्या आधारे व्यापाऱ्यांकडून काही रक्कम वसूल केली. नंतर ३० लाख रूपयांची खंडणी मागितली. या घटनेतील युवती व एक युवक या दोघांना राहुरी पोलिस पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, श्रीरामपूर डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक चारुदत खोंडे, हवालदार सय्यद, महिला पोलिस नाईक कोकेकर यांनी केली.

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द परिसरातील एका ४० वर्षीय व्यापाऱ्याला एका अनोळखी युवतीने फोन करुन क्रेडीट कार्ड पाहिजे का ?, असे विचारले. त्यानंतर दोघांची ओळख होऊन व्हॉटॲप व इन्स्टाग्रामवर चॅटींग चालू झाली. त्या युवतीने गोड बोलून त्या व्यापाऱ्याकडून काही रक्कम वसूल केली. ती रक्कम परत घेण्यासाठी व्यापाऱ्याने युवतीस फोन केला. तेव्हा तिने शिर्डीला आल्यावर तुमचे पैसे देते असे सांगितले. दि.१७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी त्या तरूणीने व्यापाऱ्याला कोल्हार खुर्द (ता.राहाता) येथील एका लॉजवर बोलावून घेतले. दोघांची भेट झाल्यावर तिने व्यापाऱ्याला प्रसादामध्ये गुंगीचे औषध देऊन दारू पाजली. यानंतर व्यापाऱ्याबरोबर नको, त्या अवस्थेत व्हिडीओ काढून घेतला. यानंतर तरूणीने व्यापाऱ्याला विवाह कर नाहीतर ३० लाख रूपये दे. अन्यथा तुझा व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. दरम्यान त्या युवतीने व्यापाऱ्याकडून सुमारे ५० हजार रूपये वसुली केली. त्या संबंधित व्यापाऱ्याने या घडलेल्या घटनेची राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे हे तपास करीत होते. खोंडे यांनी योग्य त्या पद्धतीने तपास करून या गुन्ह्याची उकल केली. या गुन्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यातील एक २१ वर्षीय युवती व या मागील मास्टर माईंड असलेला व्यापाऱ्याचा भाचा असल्याचे उघड झाले. व्यापाऱ्याच्या भाच्याला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चारुदत खोंडे, हवालदार सय्यद, महिला पोलिस नाईक कोकेकर यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.१३) पुणे येथून त्या युवतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
या घटनेबाबत युवती व व्यापाऱ्याचा भाचा या दोघांवर गुन्हा रजि. नं. १२/२०२३ भादंवि कलम ३२८, ३८४, ३८५, ५०६ प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सोशल मिडीयावर कोणत्याही अनोळखी व्यक्ती सोबत मैत्री करु नका. सध्या सेक्सटोर्शन हा गुन्ह्याचा प्रकार खूप जास्त प्रमाणात आढळून येत असल्याने बरेच नागरिक यास बळी पडत आहेत. असा प्रकार झाल्यास त्वरित पोलीसांना कळवावे. आपले नाव गोपनिय ठेवण्यात येईल. असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!