काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुलात ‘इंटर सिस्टीम सेमिनार’चे रविवारी आयोजन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
वैद्यकीय क्षेत्र हे सेवा अर्थात सर्व्हिस, किंवा चॅरीटेबल राहिले नसून त्यातील “काॅर्पोरेट” धनदांडग्या प्रवृत्तीच्या शिरकावामुळे धनदांडग्यांच्या अर्थात “पैसा डालो और तमाशा देखो” या पेक्षा एकापेक्षा एक वरचढ अरेबियन नाईटससारख्या सुरस अन आणि धंदेवाईक व आर्थिक सौदेबाजी किंवा चढाओढ असलेल्या त्यात विमा कंपनीने दिलेले हेल्थ पॅकेज, शासकीय योजनेच्या मिळणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजना यामुळे थोडेसे आशादायी चित्र असताना वैद्यकीय क्षेत्रातील आयुर्वेद, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी या शास्त्रातील प्रभावीपणे काम करीत असलेल्या व्यक्तींना पाचारण करून या वैद्यकीय शास्त्रातील त्रुटी व गैरसमज दूर व्हावेत या दृष्टीने कै.काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फौंडेशन यांनी सन १९८९ साली स्थापन केलेल्या काकासाहेब म्हस्के होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गेली ३० वर्षे अव्याहतपणे करीत आहे. यंदाही इंटर सिस्टीम सेमिनारचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम पार पाडण्यासाठी डॉ. अक्कलकोटकर या आयुर्वेद शास्त्र पंडित तर होमिओपॅथीतील डॉ. मयुरेश महाजन, ठाणे तर डॉ. अभितेज म्हस्के, ॲलोपॅथी, सांधेरोपण व पुनर्रोपण तज्ञ, पनवेल यांना “संधिवात” या विषयावर प्रबोधन करण्यासाठी दि.१५ जानेवारी रोजी संस्थेच्या आवारात आमंत्रित केले असल्याची माहिती काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फौंडेशनचे कार्यकारी विश्वस्त डॉ. सुभाष म्हस्के यांनी दिली.
डॉ.म्हस्के पुढे म्हणाले की, आर्थरायटीस (संधिवात) आणि आयुर्वेद हजारो वर्षापूर्वीचे भारतीय संस्कृतीचे वैद्यकीय शास्त्र आयुर्वेदमध्ये संधिवात यावर प्रकृतीवर आधारित उपचार पध्दती अर्थात संधिवात ही “वात” प्रकृती दुरुस्त करण्यासाठीचे औषधे पोटातून घेणे, लेप, शेकणे इ. उपाय त्यामध्ये शास्त्रीय पद्धतीने कोणत्या पद्धतीमुळे रुग्णास फायदा होऊ शकतो हे विस्तृतपणे उदाहरणासह पुण्याचे वैद्य मंदार अक्कलकोटकर हे विस्तृत करणार आहेत. नव्या युगातील आयुर्वेदाचे “पंचकर्म उपचार” हे झटपट बरे होण्यासाठी पण खडतर उपायही खूप प्रसिद्ध, प्रभावी अन आयुर्वेद शास्त्रातील सर्वोच्च आधुनिक प्रणाली आहे.
होमिओपॅथिकमध्ये म्हणजे डॉ. हनिमन या एम.डी. मेडिसीन या जर्मनीतील सुप्रसिद्ध ॲलोपॅथी प्रॅक्टिशरने ॲलोपॅथी किंवा मॉडर्न मेडीसीन या सध्याच्या प्रचंड वेगाने वाढत असलेल्या वैद्यकशास्त्रातील दुष्परिणामाची (साईड इफेक्ट) व परिणामकारकता त्या औषधातील प्रमाण शेकडो, हजारो पटीने घटवून दिलेल्या साखरेच्या गोण्यावरील औषधानेही परिणाम सिद्ध होणारी सुमारे दोनशे, तीनशे वर्षापूर्वी ज्ञात असलेली अफाट लोकसंख्येच्या भारतासारख्या देशात विशेषतः ग्रामीण भागामध्ये किफायतशीर होवू शकणारी ही उपचार पद्धतीबद्दल ठाण्याचे सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ. मयुरेश महाजन माहिती देणार आहेत.
ॲलोपॅथीमधील गोळ्या, औषधे, स्टेरॉइड व तसेच इंजेक्शन्स देऊनही परिणाम किंवा फायदा न झालेल्या रुग्णांना “जॉईन्ट रिप्लेसमेंट” अर्थात सांधेरोपण म्हणजे नैसर्गिक सांधा बदलून कृत्रिम सांधा बसवून वयोवृद्ध व संधीवात ग्रस्त रुग्णांना तातडीने वेदनारहित व स्वावलंबी करण्याचे आपल्या अहमदनगरचे सुपूत्र व काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फौंडेशनचे विश्वस्त डॉ. अभितेज म्हस्के आपल्या युरोपमधील १० वर्षाच्या अनुभवातून केवळ सांधेरोपण नाहीतर पुर्नसांधेरोपण म्हणजे एकदा केलेले परंतू काळपरत्वे टाकावू झालेले जुने कृत्रीम सांधे बदलून पुन्हा नवीन सांधे टाकण्याचे तंत्र रुग्णांना सामान्यतः कसे रास्त दरात उपलब्ध होतील हेही मार्गदर्शन करणार आहेत.
याबरोबरच गेली ३० वर्षापासून काकासाहेब म्हस्के होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात वैद्यकीय सेवा देणारे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा ही १५ जानेवारी रोजी आयोजित केला आहे. नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्रामभैय्या जगताप या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभाग नोंदविणार आहेत.
यावेळी विश्वस्त डॉ.सुमती म्हस्के, विश्वस्त डॉ.दिप्ती ठाकरे, विश्वस्त
डॉ.अभितेज म्हस्के, प्रशासक समीर ठाकरे, कै. काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या
डॉ.नीलिमा भोज, पार्वतीबाई म्हस्के इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे प्राचार्य अजित चवरदार,कै. काकासाहेब म्हस्के डी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य
रवींद्र हनवटे आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!