राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मोतीबिंदू शिबिर पत्रकारांचा गौरव

जालिंदर बोरुडे यांचे सामाजिक कार्य महाराष्ट्रात पोहोचले आहे-सूर्यकांत नेटके
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
– . नागरदेवळे येथे फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त व पत्रकार दिनाचे औचित्य साधून मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी फिनिक्स सोशल फाउंडेशनच्यावतीने पत्रकारांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.याप्रसंगी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत नेटके, पत्रकार सुर्यकांत वरकड,एबीपी माझाचे सुनील भोंगळ, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा ढाकणे, दीपक कासवा, प्रेस फोटोग्राफर अमोल भांबरकर, प्रसाद शिंदे,शुभम पाचारणे, स्वामी गोस्वामी,विठ्ठल राहिंज, सारडा महाविद्यालयाचे एचओडी प्रा.एस एन.खान, केकेआय बुधराणी हॉस्पिटलचे रोहित थोरात, गिरीश पाटील, माया आल्हाट आदी उपस्थित होते.

मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत नेटके म्हणाले की, समाजसेवक जालिंदर बोरुडे गेल्या 24 वर्षापासून राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असलेले कार्य करीत आहेत. महिन्याच्या प्रत्येक 10 तारखेला मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेणारे जालिंदर बोरुडे हे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती असावेत.बोरुडे यांच्या प्रयत्नातून आत्तापर्यंत मोतीबिंदूच्या साडेसहा लाख शस्त्रक्रिया झाल्या आहेत.मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य होत आहे.कोरोना काळातही मोठ्या प्रमाणात शिबिरे भरवून रुग्णसेवेचे कार्य सुरू ठेवले आहे. अलीकडच्या काळात दुर्दैवी घटना घडली जालिंदर बोरुडे यांच्या धर्मपत्नीचे निधन झाले.तरीही श्री.बोरुडे यांनी अविरतपणे न थांबता मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून समाजसेवेचे हे व्रत सुरू ठेवले आहे. वेळप्रसंगी स्वतःपदरमोड करून मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे. निस्वार्थ सेवा आणि त्याग करुन जालिंदर बोरुडे यांचे सामाजिक कार्य महाराष्ट्रात पोहोचले आहे.असे प्रतिपादन यांनी केले आहे
सूर्यकांत वरकड म्हणाले,गाव खेड्यातील अनेक वृद्धांना दृष्टी देऊन त्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचे कार्य फिनिक्स फाऊंडेशनचे जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.जालिंदर बोरुडे यांचे कार्य समाजाभिमुख आहे. एबीपी माझाचे सुनील भोंगळ म्हणाले,आज पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांच्या सत्कार केल्याबद्दल मी जालिंदर बोरुडे यांचे आभार मानतो.खरे तर जालिंदर बोरुडे यांचा सत्कार करायला हवा.आम्ही तर केवळ समाजाच्या समस्या मांडत असतो.पण प्रत्यक्षात समस्या सोडवण्याचे कार्य जालिंदर बोरुडे व त्यांचे सहकारी करत आहेत.
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा ढाकणे म्हणाले,फिनिक्स सोशल फाउंडेशनने पत्रकारांचा जो सन्मान केला आहे.त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. प्रा.खान म्हणाले,जालिंदर बोरुडे अत्यंत तळमळीने समाजातील दीनदुबळ्या वंचित घटकांची सेवा करीत आहेत.कोणतीही मदत न घेता स्वखर्चाने पदरमोड करून शिबिराच्या माध्यमातून रुग्णसेवेचे कार्य श्री बोरुडे करीत आहे.

अमोल भांबरकर म्हणाले, “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”या भगवद्गीतेत सांगितलेल्या कर्म योगाप्रमाणे समाजसेवक जालिंदर बोरुडे कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ सेवेचे कार्य करीत आहेत. दीपक कासवा,विजय मते,शुभम पाचारणे,प्रसाद शिंदे यांनी फिनिक्स सोशल फाउंडेशन च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या मोतीबिंदू शिबिरात 448 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर 113 रुग्णांना शस्त्रक्रिया साठी पुणे येथे पाठविण्यात आले.या शिबिरास पंचक्रोशीतील अनेक नागरिक उपस्थित होते.फिनिक्स चे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र बोरुडे यांनी केले.तर आभार बाबासाहेब धीवर यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!