सावळीविहीर बु. लोकनियुक्त सरपंचपदी ओमेश जपे पा., विकास जपे पा.उपसरपंचपदी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहाता –
तालुक्यात‌ राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या सावळीविहीर बु. लोकनियुक्त सरपंचपदी ओमेश साहेबराव जपे पा. तर उपसरपंचपदी विकास नानासाहेब जपे पा. यांनी शुक्रवारी (दि.३०) यांनी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा., यांच्या मार्गदर्शनाखाली पदभार स्वीकारला. प्रथम पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पा. यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या दरम्यान कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांचा फेटा बांधून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती बाळासाहेब जपे पा. यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावळीविहीर बु. प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ रूपालीताई आगलावे या होत्या.
पदग्रहण सोहळा कार्यक्रमास श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, अहमदनगर‌ भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. बोठे, ‌राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊसाहेब जेजुरकर, नामदेवराव परजणे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे पा., शिर्डी नगरपंचायत प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते पा., ज्ञानेश्वर आबा गोंदकर पा., अभय शेळके पा., शिवाजी राजे गोंदकर, उत्तम कोते पा., वसंतराव कोते पा., राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती बाळासाहेब जपे पा. मा. जि.प. सदस्य व पुणतांबा आशा केंद्र कार्यकारी अधिकारी डॉ. धनंजय धनवटे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब खर्डे , ॲड.आर एस जपे पा, भाऊसाहेब जपे पा, रावसाहेब सुंबे शिक्षक नेते , बाळासाहेब चव्हाण (पुणतांबा), वाघोली (पुणे)चे सरपंच बापूसाहेब हरगुडे ,नानासाहेब काळवाघे ,संदीप काळवाघे , विजय कातोरे,
सावळविहीर खुर्द सरपंच अशोकराव जमदडे पा., राजेंद्र चौधरी, सौ रूपालीताई संतोष आगलावे पा , गणेश कापसे पा, रमेश आगलावे पा, राजेंद्र आगलावे, सुरेश जपे, कैलास सदाफळ, किशोर आगलावे जिजाबा आगलावे पा ,शिवाजीराव आगलावे,संभाजी जपे, राजेंद्र कोठारी, विठ्ठलराव मातेरे,प्रभाकर जपे,शांताराम जपे स्वप्निल पारडे ,निवडणूक निर्णय अधिकारी पोळ, सहाय्यक निवडणूक अधिकारी रावसाहेब खर्डे, सुनील जपे, सुनील आगलावे , सचिन भैरवकर, अविनाश खर्डे, शेख गुरुजी, मारुती कापसे, राजेंद्र कापसे, सोपान पवार, संतोष गायकवाड,अनिल वाघमारे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ व इतर अनेक मान्यवर या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री यांचे निधन झाल्याने यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार गणेश कापसे यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!