पाथर्डीत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे वचर्स्व ; प्रहार, वंचित ने खाते उघडले
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठीच्या पंचवार्षीक सार्वत्रीक निवडणुकीत मतदारांनी विद्यमान सत्ताधा-यांना कात्रजचा घाट दाखवित.
प्रस्थापितांना घरी बसवत नवीन चेह-यांना संधी दिली आहे.अकरा ग्रामपंचायती पैकी भाजपा सहा, राष्ट्रवादी कांग्रेस दोन, प्रहार जनशक्ती पक्ष एक , वंचित बहुजन आघाडी एक तर शिवसेना ठाकरे गट एक असे पक्षीय वर्चस्व मिळाले असुन असुन कांग्रेस व शिवसेना शिंदे गटाला निवडणुकीत खाते सुद्धा उघडता आले नाही.
तिसगाव ग्रामपंचायती मध्ये काशिनाथ पाटील लवांडे यांच्या गटाची गेल्या पंचेचाळीस वर्षाची सत्ता संपुष्टात आली आहे. भालगाव ग्रामपंचायती मध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. तेथे भाजपाच्याच दुसऱ्या पॅनलने विजय मिळवला आहे, भालगावच्या विद्यमान सरपंच डॉ.मनोरमा खेडकर यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपाने सोनोशी.निवडुंगा, तिसगाव, भालगाव, मोहरी कोळसांगवी ग्रामपंचायती वर वर्चस्व मिळवित सर्वाधिक सहा ग्रामपंचायती जिंकल्या आहेत तर राष्ट्रवादीने वडगाव, वैजुबाभुळगाव या दोन ग्रामपंचायती वर वर्चस्व मिळविले आहे. कोरडगाव ग्रामपंचायती मध्ये सत्ता परीवर्तन होवुन वंचीत बहुजन आघाडीने वर्चस्व मिळविले आहे,जिरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने एकहाती सत्ता काबीज केली आहे. कोल्हार ग्रामपंचायत शिवसेना ठाकरे गटाने जिंकली आहे.
निवडून आलेली ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य पुढील प्रमाणे– भालगांव– रोकडे पोपट विलास (सरपंच) सदस्य – खेडकर सतिष रामकिसन, खंदारे शिला वौजिनाथ, कासुळे पांडूरंग त्रिंबक, खेडकर अंबादास शेषराव, दौंड सुमन श्रीकृष्ण, कोरडे पार्वती उध्दव, खेडकर बाळासाहेब दामोधर, खेडकर दिपा माणिक, खेडकर पार्वती दिलीप, खरमाटे सुधाकर रंगनाथ, सुपेकर लक्ष्मण शेषराव, कासुळे अश्विनी लहु.
जिरेवाडी – आंधळे लक्ष्मी महादेव (सरपंच) सदस्य – अनिल नवनाथ आंधळे,पवार वनिता समाधान, आंधळे चंद्रभागा नवनाथ, आंधळे कौशल्या भोंजी, आंधळे मनिषा प्रकाश, बडे राजेंद्र विक्रम, कचरे रंजना माणिक.
तिसगांव – शेख मुनिफा इलियास (सरपंच) सदस्य – भुजबळ अमोल रामनाथ, पठाण बिस्मीला कयुम, शेख फरहद रियाज, गारुडकर संगिता गोरक्ष, शेख मुमताज मुस्ताफा, मगर पंकज राजेंद्र, ससाणे काशिनाथ माधव, शेख रजिया लतीफ, वाघ प्रदिप रावसाहेब, लंवाडे काशिनाथ राधाकिसन, शिंदे छाया बाळासाहेब, वाघ गिताराम रंगनाथ, साळवे प्रमोदिनी सचिन, थोरात अश्विनी सागर, पठाण सिंकंदर जलाल,
नरवडे कल्पना रमेश, लंवाडे सुरेखा बाळासाहेब.
कोरडगांव – म्हस्के साखराबाई नामदेव (सरपंच) सदस्य – मुखेकर अरुण एकनाथ, ससाणे माया अनिल, वाळके मनिषा नागनाथ, बोंद्रे स्वराज गहिनीनाथ, देशमुख बाळासाहेब लक्ष्मण, देशमुख मोहिनी काकासाहेब, कांजवणे अशोक दामोधर, काकडे संगिता सुदर्शन, देशमुख त्रिंबक गुलाबराव, देशमुख प्रतिभा प्रताप, शेख मुमताज युनुस.
निंवडूगे – देशमुख वैभव विठल( सरपंच) सदस्य – मरकड अमोल शिवाजी, मरकड कोमल अमोल, मरकड सरस्वती उत्तम, कोलते योगेश शहाराम, क्षीरसागर गोदावरी अशोक, मरकड स्वाती ईश्वर, शिंदे हर्षल प्रल्हाद, सावंत शोभा माणिक, चव्हाण मयुर अरविंद, ढवळे बाबासाहेब मोहन, चव्हाण कल्पना प्रविण.
कोल्हार – नेटके राजु बन्सी ( सरपंच) सदस्य – पालवे संदिप रावसाहेब, पालवे ज्योती गोरक्षनाथ, पालवे मालन हौसराव, पालवे अभिजीत अशोक, नेटके सुशिला देविदास, गर्जे माधुरी आत्माराम, पालवे शर्मा भास्कर, पालवे सोपान विक्रम पालवे मनिषा नवनाथ.
कोळसांगवी – फुंदे सुरेखा युवराज ( सरपंच ) सदस्य – घुले बबन नारायण, घुले कविता कल्याण, गाडे द्रोपदी अर्जुन, घुले दादासाहेब रामदास,
साळवे कैरमळा सोपान, धनवडे दगडू रोहिबा, साळवे रेवुबाई हरिभाऊ.
वडगांव – बडे आदिनाथ विश्वनाथ (सरपंच) सदस्य – ढाकणे रविंद्र बबन, गिते सोजरबाई विट्ठल, ढाकणे गयाबाई दत्तू, गरड श्रीराम सुदाम, शेळके त्रिंबक रघुनाथ, गरड इंदुबाई भिमराव, बडे केशव ज्ञानदेव, सातपुते गयाबाई आण्णा, नागरगोजे शितल संदिप.
सोनोशी – काकडे सुनंदा जगनाथ (सरपंच) सदस्य -दौंड जालिंदर बाजीराव, दौंड कल्पना कुंडलीक, बोरुडे आशाबाई पावलस, काकडे गणेश श्रीधर, काकडे योगिता साईनाथ, दौंड सविता भरत, काकडे संदिप हरिश्चंद्र, दौंड शारदा अंकुश, काकडे पंचफुला अशोक.
वैजुबाभुळगांव – घोरपडे ज्योती संतोष – (सरपंच) सदस्य – घोरपडे मनेश बाबासाहेब, भवार मिरा रंगनाथ, घोरपडे सुनिता सिदू, लोहकरे रावसाहेब म्हतारदेव, आमले सिमा अरुण, गुंजाळ सुरज राजेंद्र, गुंजाळ सुजाता सुधाकर,
मोहरी – वाल्हेकर आशाबाई पोपट(सरपंच) सदस्य – डोईफोडे कल्पजित रामहरी, नरोटे अलका देविचंद, नरोटे सविता अनिल, नरोटे संजय साहेबराव, सुसलादे भिमराव रामराव, वाघमोडे अशोक साहेबराव, राजगुरु छाया बन्सी, नरोटे जिजाबाई दादासाहेब असे आहेत.
तहसिलदार शाम वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अकरा निवडणुक निर्णय अधिका-यांच्या मतदीने मतमोजणी झाली.पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, प्रविण पाटील रामेश्वर कायंदे यांनी सहका-यांसह चोख बंदोबस्त ठेवला.