ग्रामपंचायत निवडणूक हद्दीमध्ये कलम 36 व 33 लागू

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
:- जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम मा. राज्य निवडणुक आयोग, यांच्याकडून निश्चित करण्यात येऊन दि.१८ डिसेंबर, 2022 रोजी निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान होऊन दि‌.20 डिसेंबर, 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ व 33 (ओ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक हददीत कोणत्याही इसमास गैरशिस्त वागणूक करण्यास मनाई आदेश जारी केले असून हे आदेश दि.20 डिसेंबर 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.


जिल्हयातील भिंगार कॅम्प, नगर तालुका, एमआयडीसी, पारनेर, श्रीगोंदा, बेलवंडी, कर्जत, जामखेड, शेवगांय, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपुर शहर, श्रीरामपुर तालुका, नेवासा, सोनई, शनिशिंगणापुर, पारगांव, संगमनेर शहर, संगमनेर तालुका, आयी, राजुर, अकोले, राहाता, शिर्डी, लोणी, कोपरगांव शहर, कोपरगाव तालुका, मीरजगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मनाई आदेश जारी केले आहेत.
याबाबत कोणास सवलत अगर परवानगीची आवश्यकता असल्यास त्या त्या पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराखाली असलेल्या क्षेत्रात प्रसंगानुसार आवश्यक ते कोणत्याही नियनांचे आदेशांचे उलंघन होणार नाही अशा रितीने आवश्यक ते आदेश देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!