संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी – गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुरस्कृत गाव विकास आघाडी सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतची निवडणूक लढवीत असून या गाव विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमतने विजयी करण्याचे आवाहन या आघाडीचे नेते राजू मामा पगारे यांनी केले आहे.
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात महा विकास आघाडी पुरस्कृत गाव विकास आघाडी चे उमेदवार उभे असून त्यांच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ नुकताच येथील श्री हनुमान मंदिरात संपन्न झाला. यावेळी गाव विकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार व माजी सरपंच अशोकराव पाटील आगलावे यांच्यासह सदस्य पदासाठी चे उमेदवार सिद्धी राहुल आगलावे, प्रवीण विलास आरणे, आरती देविदास मोरे, मोहन भगवान मोरे ,कविता विनोद गायकवाड ,आशिष यासीन सय्यद, रवीना योगेश शेलार आदीसह समर्थक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना यावेळी राजू( मामा) पगारे बोलताना म्हणाले की, सावळीविहीर बुद्रुक गावामध्ये सर्वसामान्य ,गोरगरीब जनतेचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी गाव विकास आघाडी वचनबद्ध असून छोट्या छोट्या कामासाठी गोरगरीब सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार आम्ही उभे केले आहेत. सर्व उमेदवार सर्वसामान्य असल्याने ते नक्की सर्वसामान्यांचे प्रश्न समजून ते सोडण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर गाव विकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार व माजी सरपंच अशोकराव आगलावे पा. यांनीही यावेळी आपण गावात यापूर्वीही सरपंच असताना मोठा विकास साधला आहे. अनेक कामे केलेली आहेत. गावाचा विकास ,गावातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता असो वा नसो आपले काम सुरू असते. जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत. गोरगरीब, सर्वसामान्य जनता ही हातावर पोट भरून काम करते त्यांचे छोटे छोटे प्रश्न असतात. ते सोडवण्यासाठी नक्कीच महाविकास आघाडी पुरस्कृत गाव विकास आघाडी प्रयत्नशील राहील .यासाठी महाविकास आघाडी पुरस्कृत गाव विकास आघाडी च्या सर्व उमेदवारांना विजयी करावे. आपण गावाच्या विकासासाठी परत 72 वर्षे वय असून सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या आग्रहाखातर व गावाच्या विकासासाठी सरपंच पदासाठी उभे असून या महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करावे. व एक इतिहास रचावा. असे आवाहनही अशोकराव आगलावे पा. यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात काही नेत्यांनीही आपले मनोगत मांडले. यावेळी राहता काँग्रेस कमिटीचे पंकज लोंढे, संजय पगारे आदींसह विलास आरणे, प्रदीप वाघ ,देविदास मोरे, सिद्धार्थ मोकळ, सिद्धू बनकर, भारत आरणे ,नितीन जगताप, राहुल आगलावे, विनोद गायकवाड आदींसह कार्यकर्ते व सर्व ग्राम विकास आघाडीचे उमेदवार समर्थक यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दिनेश आरणे यांनी मांडले. कार्यक्रमानंतर गाव विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ येथील मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला.