मतदारांचाही मिळत आहे भरघोस पाठिंबा–बाळासाहेब जपे व ओमेश जपे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी- गावाच्या विकासासाठी गट-तट सोडून एकत्रित ग्रामपंचायत निवडणूक लढवून येथील प्रश्न समस्या सोडवण्यासाठी एकत्र आलेल्या ना.राधाकृष्ण विखे पा.व डॉक्टर खासदार सुजय विखे पाटील यांच्या जनसेवा व जनपरिवर्तन पॅनलला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन पं.सं.चे उपसभापती व या पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार ओमेश साहेबराव जपे आणि राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जनार्दन जपे यांनी केले आहे.
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु. येथील ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराचा जनसेवा व जनपरिवर्तन या एकत्रित आलेल्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ नुकताच येथील श्री हनुमान मंदिरात विविध मान्यवर आणि मतदारांच्या उपस्थितीत नुकताच उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रामदास आगलावे होते. यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या गणेश आगलावे, आशिष आगलावे, दत्तात्रय आगलावे, दिलीप गायकवाड, अनुजा आनंद जपे,शैला महेंद्र पवार, या सहा सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी पं. स. मा. सदस्य साहेबराव जपे यांनी गावातील ना. विखे पा. यांचे दोन्ही गट एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकशाही मार्गाने काही उमेदवार विरोधात लढत असल्यामुळे ही निवडणूक लादली गेली आहे. तरीही गावच्या विकासासाठी दोन्ही गट एकत्र आल्यामुळे नक्कीच मोठे प्रयत्न यापुढे होतील. त्यासाठी या पॅनलच्या सहा जागा तर बिनविरोध आल्या आहेत. मात्र या पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार ओमेश जपे, आणि सदस्य पदाचे उमेदवार सुजाता भोसले, मीना छबुराव बनसोडे, सागर आरणे, रूपाली संजय जपे, विकास जपे, केशरबाई गणपतराव सदाफळ, सुवर्ण प्रदीप नितनवरे, कल्पना दिलीप बाठीया, संतोष कसबे या पॅनलच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तर राहता कृ. उ.बा. समितीचे .मा.उपसभापती बाळासाहेब जपे यांनीही गावात सर्वजण एकत्र आल्यामुळे विकासाला गती मिळेल. विविध समस्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणता येईल. असे सांगून या पॅनलचे सरपंच उमेदवार ओमेश जपे व सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी जिजाबा आगलावे, शांताराम जपे ,दिलीप बाठीया, सुरेश वाघमारे ,गणेश कापसे, आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत सरपंच पदाचे उमेदवार व पं.स.चे मा. उपसभापती ओमेश जपे यांनी केले. तर गणेश आगलावे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला रमेश आगलावे, सोपान पवार, संजय मातेरे, अ.फ. शेख गुरुजी, विठ्ठलराव कापसे, बाबा मातेरे,सरपंच सौ. रुपाली संतोष आगलावे, उपसरपंच गणेश कापसे,सोसायटीचे चेअरमन कैलास सदाफळ ,व्हा.चेअरमन किशोर आगलावे. माणिकराव कोठारी,सुरेशदादा जपे, नवनाथ जपे, रंगनाथ सदाफळ,छबुराव बनसोडे, दादा कसबे, किरण आगलावे,कैलास भोसले,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सोसायटीचे सर्व संचालक, तसेच गावातील विविध आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ मतदार, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर येथील मंदिरांमध्ये नारळ वाढवण्याचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर आता या दोन्ही एकत्रित असणाऱ्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा प्रचार मोठ्या उत्साहात सुरू असून प्रत्येक प्रभागात प्रचार फेऱ्या घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत. मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे या पॅनलच्या नेत्यांनी सांगितले आहे. व आमचे सर्व उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वासही प्रचार फेरी दरम्यान या पॅनलच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.