👉बचतगटांनी उत्पादनांना बाजारपेठेसाठी ब्रॅन्डींगवर भर द्यावा*
👉लोणी येथे बचतगटांतील महिलांनी बनवलेल्या वस्तूचे प्रदर्शन, विक्री व खाद्य महोत्सवाचे आयोजन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी –राज्य शासन लोकाभिमुख काम करत आहे. महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर शासनाचा भर आहे. केंद्र व राज्य सरकार बचतगट चळवळीला प्राधान्य देत आहे. बचतगटांची उत्पादने दर्जेदार आहेत. यामुळे पुरक व्यवसायाला चालना मिळत असून बचत गटांनी आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी काळानुरूप आकर्षक पॅकींग, ब्रॅन्डींग वर भर दिला पाहिजे. अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे व्यक्त केली.
राहाता तालुका सक्षम महिला महोत्सव अर्थात “स्वयंसिद्धा यात्रा २०२२”प्रदर्शन – विक्री व खाद्य महोत्सवाचे उदघाटन लोणी (ता.राहाता) येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्य, शहरी व ग्रामीण जीवन्नोत्रती अभियान अंतर्गत जनसेवा फौंडेशन लोणी, राहाता पंचायत समिती, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर, कृषी विभाग व आत्मा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होत्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा ग्रामीण विकास यंञणेचे प्रकल्प संचालक सुशिलकुमार पठारे, जिल्हा व्यवस्थापक सोमनाथ जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे, डॉ हरिभाऊ आहेर, शैलेश देशमुख, ताराबाई खालकर, सरपंच कल्पना मैड, प्रकल्प अधिकारी रुपाली लोंढे, अशोकराव धावणे, ऋषिकेश खर्डे यांच्यासह पदाधिकारी व बचतगटातील महिला सदस्य, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
महसूलमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, पूर्वी बचत गट स्थापना करावी लागत होती. आता ही एक चळवळ निर्माण आली आहे. महिला बचतगटांना नाबार्डसह विविध बँका, संस्था मदत करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य नेतृत्वाखील लोकाभिमुख काम करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बचतगटातील ८ कोटी महिलांना विविध उपक्रमांत सहभागी करून घेतले आहे.
बचत गटांचे उपक्रम, जनसेवा फौडेशनची वाटचाल याविषयी माहिती देताना श्रीमती शालिनी विखे पाटील म्हणाल्या, महिलांनी केवळ बचत न करता व्यावसाय करून आपली वेगळी ओळख निर्माण करावी. श्री.येरेकर यांनी बचतगटांसाठी सुरु असलेल्या विविध योजनाची माहिती यावेळी दिली.
‘स्वयंसिद्धा २०२२’ प्रदर्शन-विक्री व खाद्य महोत्सवाचे मध्ये शेती तंत्रज्ञान, बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन, खाद्य महोत्सव आदी उपक्रम ११ डिसेंबर पर्यंत सर्वासाठी खुला आहे. यावेळी कृषी विभागाच्या वतीने कृषी यांञिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर वितरण देखील करण्यात आले. गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी प्रास्ताविकात विविध उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन गायत्री म्हस्के व डॉ. हरीभाऊ आहेर यांनी आभार मानले.