संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : केंद्र शासनामार्फत दि. 19 नोव्हेंबर 2022 ते दि. 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत “स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2023” अभियान देशात राबविणेत येत आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रा. अभियानात लोकसहभाग वाढविणे, हागणदारीमुक्त अधिक घटकांबाबत जनजागृती करणे, गावांगावांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा निर्माण करणे , गावांचा सहभाग वाढविणे हा उद्देश “स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2023″चा आहे. याची प्रक्रीया दोन टप्यात घेण्यात येणार आहे. यामध्ये पहीला टप्यात ग्रामपंचायतींचे स्वयं: मुल्यांकन व पुर्नपडताळणी करणे आणि दुसरा टप्यात जिल्हा स्तरीय कामाचे मुल्यांकन करणेत येणार असल्याची माहीती आशिष येरेकर यांनी दिली
स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2023 ची प्रक्रीया दोन टप्यात पूर्ण केली जाणार आहे.
पहीला टप्पा :- ग्रामपंचायतींचे स्वयंम मुल्यांकन व पुर्व पडताळणी :- दि. 19 नोव्हेंबर ते दि. 15 डिसेंबर 2022
दुसरा टप्पा :- जिल्हा स्तरीय मुल्यांकन :- :- दि. 1 मे त दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत
पहीला टप्पा :- ग्रामपंचायतींचे स्वयं: मुल्यांकन व पुर्व पडताळणी :-
गावातील कुटुंबस्तरावरील आणि सार्वजनिक स्तरावरील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन व जाणीव जागृती क्षमता बांधणी अंतर्गत स्वच्छतेच्या घटकांच्या आधारे ई ग्राम स्वराज्य पोर्टलवर ग्रामपंचायतींने प्रश्नावली भरुन स्वयं: मुल्यांकन करणेचे आहे. यानुसार तालुका स्तरावरुन 2000 लोकसंख्ये पेक्षा कमी, 2000 ते 5000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती व 5000 लोकसंख्येपेक्षा जास्त ग्रामपंचायतींची पुर्व पडताळणी करुन या तीन श्रेणी मध्ये प्रत्यकी 5 ग्रामपंचायती नुसार एकूण 15 उत्कृष्ठ ग्रामपंचायतींची निवड तालुका व जिल्हा स्तरावर करावयाची आहे. यानुसार जिल्हा स्तरावर उत्कृष्ठ ग्रामपंचायती, राज्य स्तरावर उत्कृष्ठ ग्रामपंचायती व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ठ ग्रामपंचायती अशा तीन श्रेणी मध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील नामनिर्देशित ग्रामपंचायतींची स्वतंत्र पडताळणी केली जाणार आहे.
दुसरा टप्पा :-जिल्हा स्तरीय मुल्यांकन
- सेवा स्तर प्रगती (SLP) :- 500 गुण
SBM- MIS वरील ODF + प्रगतीनुसार गुणांकन केले जाणार आहे. - प्रत्यक्ष निरिक्षण :- 500 गुण
केंद्र व राज्य स्तरावरील त्रयस्थ यंत्रणे मार्फत नमुना सर्वेक्षणाव्दारे प्रत्यक्ष निरिक्षण करणेत येणार आहे.
पहीला व दुसरा टप्पा राबविणेसाठी निश्चित केलेले वेळापत्रक:-
- ग्रामपंचायतींनी प्रथम स्वयं: मुल्यांकन पुर्ण करणे. – दि. 19 नोव्हेंबर ते दि. 15 डिसेंबर 2022
- ग्रामपंचायतींनी अंतिम स्वयं: मुल्यांकन पुर्ण करणे. – दि. 30 एप्रिल 2023 पर्यंत
- स्वयंमुल्यांकन केलेल्या ग्रामपंचायतींची पडताळणी पुर्ण करणे.
- a) तालुका स्तर :-दि. 1 मे ते 15 जुन 2023
- b) जिल्हा स्तर:-दि. 16 जुन ते 30 जुन 2023
- c) राज्य स्तर:-दि. 1 जुलै ते 15 जुलै 2023
- जिल्हा स्तर उत्कृष्ठ ग्रामपंचायतींची निवड आणि पुरस्कार – दि. 31 जुलै 2023 पर्यंत
- राज्य स्तर उत्कृष्ठ ग्रामपंचायतींची निवड आणि पुरस्कार – दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत
- राज्याव्दारे नामनिर्देशित ग्रा.पं. च्या राष्ट्रीय एजन्सीव्दारे स्वतंत्र पडताळणी – दि. 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2023
- ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार – दि. 2 ऑक्टोंबर 2023
- “स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2023” अभियानाच्या पहील्या टप्यात जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी होवुन, स्वयं: मुल्यांकन प्रक्रीया दिनांक 15 डिसेंबर 2022 पर्यंत पुर्ण करावी तसेच या अभियानात स्वच्छतेची व्याप्ती वाढविणेसाठी ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग घेवुन, घरगुती आणि सार्वजनिक स्तरावर सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन अंतर्गत घटकांची कामे पुर्ण करुन, स्वच्छतेबाबत जाणीव जागृती निर्माण करावी असे आवाहन सुरेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद अहमदनगर यांनी केले आहे.