संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई – प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव असलेले राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची मंगळवारी शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.तर शिर्डीच्या सीओ भाग्यश्री बानायत यांची नागपूर या ठिकाणी बदली झाली आहे.
शिर्डी देवस्थानच्या सीओपदी बानायत यांची नियुक्ती झाली होती. गेल्या दीड वर्षांमध्ये त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले होते. काही ठिकाणी ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये दरी निर्माण झालेली होती, त्यामध्ये मार्ग काढून शिर्डी देवस्थानचा कारभार कशा पद्धतीने चांगल्या हाताचा येईल या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. देवस्थानामधली प्रशासकीय शिस्तही त्यांनी चांगल्या पद्धतीने लावली होती. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.
तर दुसरीकडे राज्यात महिन्यामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून कडक शिस्तीचे ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी राज्यभरामध्ये आरोग्य विभागात शिस्त सुरू केली होती. त्यांची अचानकपणे शिर्डी देवस्थानच्या सीओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.