संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी: श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानचे नूतन विश्वस्त मंडळ ( सन 2022 ते 2025 या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी) नुकतेच सुधाकर वें यार्लगड्डा (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर) यांनी जाहीर केले.
त्यानिमित्त साधून मोहटे गावातील (पाच) विश्वस्त पैकी श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपूर पांगुळ येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब किसन दहिफळे यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने श्रीवामनभाऊ विद्यालय तसेच चिंचपूर पांगुळ ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा सत्कार सभारंभ आयोजित करण्यात आला होता.
श्रीविठ्ठल-रुख्मिणी मंदिर पंढरपूर येथील विणेकरी हभप.विठ्ठल ज्ञानोबा बडे यांच्या हस्ते श्री दहिफळे सर यांचा शाल,श्रीफळ,फुलांचा हार घालून तसेच फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ.उदमले सर,घुलेसर,ढाकणे सर,अकोलकर सर,गर्जे मॅडम,मर्दाने सर,पत्रकार सोमराज बडे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विदयार्थी-विद्यार्थीनी,गावकरी आदी उपस्थित होते.
जगदंबा मातेच्या तसेच आईवडिल यांच्या आशीर्वादाने विश्वस्त म्हणून मला जी संधी मिळाली आहे, त्या संधीचे भाविकांच्या सेवेसाठी पूर्ण समर्पण देऊन काम करणार आहे.
असे यावेळी बोलतांना मोहटादेवी ट्रस्टचे नवनिर्वाचित विश्वस्त बाळासाहेब दहिफळे यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी विदयार्थ्यांना साखर वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुत्रसंचालन बाळासाहेब घुले यांनी केले तर आभार ढाकणे सर यांनी मानले.
संकलन : सोमराज बडे