संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
कोपरगाव – तालुक्यातील टाकळी फाटा धोंडीबानगर येथे चालू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून २८जणांविरुध्द अहमदनगर एलसीबी टिम’ने कारवाई केली आहे. या कारवाईत रोख रक्कम, ३० मोबाईल फोन, ४ चारचाकी व ७ दुचाकी वाहनासह एकुण २३ लाख ३५ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे सपोनि दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे, सफौ मनोजर शेजवळ, विष्णु घोडेचोर, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, भिमराज खर्से, लक्ष्मण खोकले, पोकॉ रणजीत जाधव, योगेश सातपुते, चापोहेकॉ उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
जुगार अड्डयावर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या याप्रमाणे शेखलाल शेखचाँद बागवान( रा. चर्चरोड, ता. कोपरगांव), शीतल सुभाषचंद लोहाडे ( रा. मालेगांव, जिल्हा नाशिक), विजय केदु निमसे (रा. रमाबाई नगर, मनमाड), नंदु पुजा नजन (रा. बनरोड, ता. राहाता), इम्रान याकुब मोमीन ( रा. जमदाडे चौक मनमाड, नाशिक ), कलिम भिकन बागवान (रा. इंदीरानगर, कोपरगाव ), अश्पाक जमील शेख ( रा. शांतीनगर, मनमाड, नाशिक), नितीन उत्तम शेजवळ (रा. लासलगांव, निफाड), राहुल दिलीप पाराशेर ( रा. आनंदवाडी, मनमाड, नाशिक), नाना शबा डोळस ( सुभाषनगर, ता. कोपरगांव ), शेख अमजद हाशम ( रा. खडकी, ता. कोपरगांव), सुरेश कुंडलिक सातभाई ( रा. येवला, नाशिक ), गणेश विठ्ठल जेजुरकर ( रा. पानमळा, शिर्डी, ता. राहाता), सोमनाथ बापु वाळके ( रा. लासलगांव, निफाड, नाशिक), अनिल देवराम खरात (रा. लासलगांव, निफाड, नाशिक), योगेश मुकूंद रासकर (रा. येवला, नाशिक), दिपक रामदास उंबरे ( रा. येवला, नाशिक), कैलास अशोक मुंजळ ( रा. महादेव नगर, कोपरगांव), तुषार राजेंद्र दुशिंग ( रा. टिळक नगर, कोपरगांव ), मोहसिन कलंदर सय्यद ( रा. सुराला, वैजापुर, जि. औरंगाबाद), दिपक मायकल बनसोडे (रा. वैजापुर, जि. औरंगाबाद), रविंद्र माधव सानप (रा. येवला रोड, कोपरगांव), हरीलाल फकिरा डांचे (रा. संगमेश्वर, मालेगांव, नाशिक), सुदाम पंढरीनाथ नवले ( रा. तांबोळ, ता. अकोले), सुभाष लक्ष्मण चावडे (रा. बाभुळवंडी, ता. अकोले), हरी दगडु करवर ( रा. बाभुळवंडी, ता. अकोले), विरेंद्र अरुणसिंग परदेशी (रा. येवला, नाशिक), युनूस इकबाल शेख वय 36, रा. खडकी, ता. कोपरगांव) .
याबाबत समजलेली माहिती अशी की, एसपी राकेश ओला यांनी एलसीबी पोनि अनिल कटके यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेऊन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. आदेशान्वये पोनि श्री. अनिल कटके यांनी जिल्ह्यातील जुगार व मटका अशा अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्यासाठी एलसीबी टिम’ला कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. एलसीबी टिम’ कोपरगांव, शिर्डी व राहाता परिसरात फिरुन अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना पोनि श्री. कटके यांना माहिती मिळाली की, टाकळी फाटा येथील धोंडीबानगर, (ता. कोपरगांव) येथे योगेश बन्सी मोरे याचे इमारतीचे टेरेसवर काही इसम पैशावर खेळला जाणारा तिरट नावाचा तीन पत्त्यांचा जुगार खेळत आहेत. आता गेल्यास मिळून येईल. ही माहिती पोनि श्री कटके यांनी एलसीबी टिम’ला दिली. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व कोपरगांव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेऊन कारवाई करण्याच्या एलसीबी टिम’ला सूचना दिल्या.
एलसीबी टिम’ने शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व कोपरगांव शहर पोलीस ठाण्याची टिमसह व पंचांना घेऊन माहितीतील ठिकाणी काही अंतरावर वाहने उभी करुन इमारतीचे जिन्यातून टेरेसवर गेले असता इमारतीचे टेरेसवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी काहीजण गोलाकार बसलेले दिसले. त्यांचे हातामध्ये तीन पत्ते दिसले तसेच मध्यभागी काही पत्ते व पैसे दिसल्याने पथकाची खात्री होताच सर्वांना जागेवर बसण्यास सांगून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांची अंगझडती घेता, यामध्ये रोख रक्कम व मोबाईल फोन मिळून आले, ते जप्त करण्यात आले. इमारतीसमोर पटांगणात लावलेल्या वाहनांबाबत विचारपुस करता वाहने जुगार खेळण्यासाठी आणल्याचे सांगितल्याने ती जप्त केली. या कारवाई दरम्यान २८ आरोपींना ताब्यात घेतले. अंगझडती मध्ये २ लाख ५ हजार ६७० रु. रोख रक्कम, विविध कंपनीचे ३०मोबाईल फोन, ४ चारचाकी व ७ दुचाकी वाहने असा एकुण २३ लाख ३५ हजार ३७० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. एलसीबीचे पोना शंकर चौधरी यांच्या फिर्यादीवरून पकडण्यात आलेल्यांवर कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३९७ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.