संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या Excise PSI 2021या परीक्षेमध्ये देवराई (या.पाथर्डी) येथील निलेश पालवे यांची राज्य उत्पादन शुल्क सहाय्यक निरीक्षक म्हणून निवड झाली.
यापूर्वी निलेश पालवे हे एन. एस. जी. कमांडो म्हणून सैन्य दलात कार्यरत होते. दोन वर्षापूर्वी सैन्य दलातील निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरवात केली आणि परीक्षेत यश मिळवले. या परीक्षेत ७३ क्रमांकाची रँक मिळवत निलेश पालवे यांनी यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य धनराज गुट्टे, जिल्हाध्यक्ष दादासाहेब फुंदे , शुभम जिरेसाळ, संदीप फुंदे यांनी सत्कार करून अभिनंदन केले.