संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
कोपरगाव- महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व कोपरगाव दौऱ्यावर आले असता कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी त्यांची भेट घेतली या प्रसंगी मंत्री मुनगंटीवार यांनी ढाकणे यांच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्यातर्फे देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ नद्यां अमृतवाहिनी करण्याच्या मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंकाई- टंकाई डोंगरावर उगम पावणाऱ्या व पुढे चालून कोपरगाव तालुक्यातुन वाहणाऱ्या दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदीस येऊन मिळणाऱ्या अगस्ती नदीच्या परिक्रमेकरिता
कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोदामाई सेवक आदिनाथ ढाकणे यांची या परिक्रमे करिता शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली असून ढाकणे यांनी नदी परिक्रमा कलश व ध्वज घेऊन कॅबिनेट मंत्री मुनगंटीवार यांची भेट घेत परिक्रमे विषयी तसेच गोदामाई प्रतिष्ठान च्या कामाविषयी माहिती दिली.
या प्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री मुनगंटीवार यांनी कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे व गोदामाई सेवक आदिनाथ ढाकणे यांचे कौतुक करत शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची स्वच्छता मोहीम राबवत असलेले त्यांचे हे कार्य अतिशय उल्लेखनीय असून आजच्या युवकांना प्रेरणा देणारे असल्याचा भावना कॅबिनेट मंत्री मुनगंटीवर यांनी व्यक्त करत आदिनाथ ढाकणे व त्यांच्या संपूर्ण टीमला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, श्री साई बाबा संस्थान चे माजी विश्वस्त सचिन तांबे,जिल्हा वनाधिकारी सुवर्णा माने, कोपरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा पाटील- सोनवणे, अमित कुटे शिवम् आमले आदी उपस्थित होते.