संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
अहमदनगर – काहीजण बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारस असतील,पण विचारचे नाही असे वक्तव्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पत्रकारांशी बोलताना केले.
या दरम्यान अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठक पार पडली. बैठकीत रेल्वेमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याची शेतक-यांनी मागणी केली.कोपरगाव, श्रीरामपूर, पारनेर व अहमदनगर शेतकऱ्यांनी रेल्वे क्रॉसिंग संदर्भात येणाऱ्या अडचणी मांडल्या.
यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे ब्रीज व क्राॅसिंग बाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु, असे सांगितले.
यावेळी खा.सुजय विखे पा., बीड खा. प्रतिमताई मुंडे, माजीमंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रा.भानुदास बेरड, वसंत लोढा, सुरेंद्र गांधी, रेल्वे अधिकारी उपस्थित होते.