👉सराईत चोरटा व गुटखा वाहतूक करणाऱ्यांना पकडले
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – जिल्ह्यात एसपी राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार अहमदनगर एलसीबी पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैधधंद्यासह गुन्हेगारांवर एलसीबी टिम’ने आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत.
अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत भिस्तबाग येथे रात्री चोरट्याने घरातील किचनच्या दरवाज्याच्या कडीकोंडा तोडून घरात ठेवलेल्या बॅगमधील ४१ तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला नगर -जामखेड रोडवरील टाकळी काझी बंद टोलनाक्याजवळ एलसीबी टिम’ने दुचाकीवर येताना पकडले. लिमनेश ऊर्फ थेऊर देशपांडे चव्हाण (वय ३३, रा. टेकडी तांडा, बाघळुज, पिंपरखेड, ता. आष्टी, जि बीड) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार एलसीबीचे सपोनि दिनकर मुंडे, पोहेका सुनिल चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, पोहेकॉ संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, भिमराज खर्से, संदीप चव्हाण पोकाॅ विनोद मासाळकर, आकाश काळे, चापोहेकॉ बबन बेरड व अर्जुन बडे आदिंच्या पथकाने केली.
तर दुसरी कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने कोपरगाव तालुक्यातील टाकळी नाक्याजवळ गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी, तंबाखू हे सर्व वगनर,ओमनी कारमधून घेऊन जात असतांना तिघांना अहमदनगर एलसीबी टिम’ने पकडले. या कारवाईत अन्न औषध प्रशासन व कोपरगाव पोलिसांची एलसीबी टिम’ने मदत घेतली. ही कारवाई सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, संतोष लोढे, राहुल सोळंके, पोकाॅ सागर ससाणे, रोहित वेमुल, रणजीत जाधव, चापोहेकॉ उमाकांत गावडे व भरत बुधवंत आदिंच्या पथकाने केली.