जैन सोशल फेडरेशनच्या ‘ना नफा ना तोटा’ दिवाळी फराळाचा शुभारंभ

👉नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण हीच ग्राहकांची विश्वासर्हता-रमेश फिरोदिया
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
जैन सोशल फेडरेशनच्यावतीने समाजातील सर्वसामान्य घटकांना परवडेल,अशा दिवाळी फराळ या उपक्रमाचा शुभारंभ उद्योजक सी.ए.रमेश फिरोदिया, ॲड. शरद पल्लोड व श्री बडी साजन ओसवाल श्री संघाचे नूतन अध्यक्ष व उद्योजक पेमराजजी बोथरा यांच्या हस्ते यश पॅलेस जवळील श्री महावीर भवन येथे फित कापून करण्यात आले.
याप्रसंगी दिवाळी फराळाचे संचालक मिलापचंद पटवा, प्रकाश पटवा, अमित पटवा, रुपेश पटवा, सतीश उर्फ बाबूशेठ लोढा, संतोष बोथरा, गिरिष गांधी,पोपटलाल लोढा,डॉ.अशोक महाडिक, आनंद छाजेड, डॉ.आशिष भंडारी, ॲड.शशिकांत गांधी, डॉ.निरज गांधी, सुभाष मुनोत, जीवन मुनोत, रमेश मुनोत, नंदकिशोर देशमुख उपस्थित होते.


संचालक मिलापचंद पटवा यांनी सर्वांचे स्वागत केले. गेल्या आठ वर्षापासून जैन सोशल फेडरेशनच्या सहकार्याने या दिवाळी फराळास नगरमधील नागरिक फार चांगला प्रतिसाद देतआहे.कारण फराळ बनवितांना तेल,तूप वआटा व इतर पदार्थ चांगल्या प्रतिचेच वापरले जातात. यंदाचे या फराळाचे नववे वर्ष असून, मागील वर्षी सुमारे १.२५ टन दिवाळी फराळाची आम्ही विक्री केली व यंदा १.50 टन विक्रीची आमची अपेक्षा आहे.हे सर्व पाहता आमच्या दिवाळी फराळाच्या गुणवत्तेला ग्राहकांनी दिलेली ही चांगलीच पसंती आहे,असे आम्ही समजतो. नोव्हेंबरच्या पहिल्याआठवड्यापर्यंत या फराळाची विक्री सुरु राहिल,याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.
संतोष बोथरा म्हणाले, जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून व आचार्य श्रीआनंदऋषीजी म.सा.यांच्या आशिर्वादाने हा दिवाळी फराळाचा उपक्रम ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही सुरु केला.सुरुवातीला अतिशय अत्यल्प प्रमाणात हा उपक्रमाचा आमचा प्रारंभ.आज गुणवत्तेमुळे वटवृक्षामध्ये रुपांतरीत झाला आहे. यंदाचे वैशिष्ट्ये म्हणजे या फराळासाठी अहमदाबाद वरुन खास आडाणी ग्रुपचे तेल,कोल्हापुर येथील वारणा संस्थेचे तूप ,पूना डाळ मिलचा स्पेशल क्वालिटीची दाळमैदा, या फराळासाठी वापरलाआहे. अविरतपणे रोज सुमारे पन्नास जणांचा स्टाफ हा ताजा फराळ करण्यासाठी झटत आहे हा संपूर्ण फराळ हा हायजेनिक असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे. नगरमधील प्रमुख उपनगरात या फराळाचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत असे सांगून सर्व ग्राहकांना धन्यवाद दिले. प्रकाश पटवा यांनी सर्वांचे आभार मानले.
संकलन : अनिल शहा (प्रेस फोटोग्राफर)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!