👉राज्यातील नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी गांधी जयंतीपासून श्रीगणेशा
👉वर्धा येथील सेवाग्राम मधील कार्यक्रमासाठी डाॅ. राजेंद्र सिंह, सिनेअभिनेता चिन्मय उदगिरकर यांची उपस्थिती
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई : महाराष्ट्रामध्ये गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी गांधी जयंतीपासून (ता. 2 ऑक्टोंबर) वर्धा येथील सेवाग्राममध्ये आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत ‘चला जाणूया नदीला’ महोत्सवाची प्रारंभ होणार आहे.जलबिरादरीचे ब्रँड ॲम्बेसिडर अभिनेते चिन्मय उदगीरकर हे आहेत. देशातील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. अंकाई येथे उगम पावणारी अगस्ती नदीचा चेतना यात्रा/अभ्यास परिक्रमा गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी दिली आहे.
आपण सर्व देशवासिये आरोग्यविषयी सजग आहोत तशी काळजी पण घेत आहोत. पण आपल्या आरोग्य सदृढ राखण्यासाठी नदीचे आरोग्य ठीक करण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. म्हणूनच राज्यातील 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी जलबिरादरीतर्फे समाजाच्या सहभागातून चला जाणूया नदीला हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची प्रेरणा घेऊन आम्ही या मोहिमेत सहभागी झालो आहे. अगस्ती नदीचा उगम अंकई मध्ये होतो अगस्ती नदी… अंकई, अनकुट्, सावरगाव,धुळगाव,रायते,चिंचोडी,लिंबगाव,रवंदा आणि सोनरी इथे ती गोदावरी नदी ला मिळते, असा तिचा प्रवास आहे तो आम्ही करणार आहोत प्रत्येक गावातील लोकांना भेटून जनजागृती करत करत कोपरगाव येथे सांगता कार्यक्रम घेणार आहोत. या कामासाठी आम्हाला
सुधीर मुनगंटीवार साहेब यांचे सहकार्याने
राज्याला पूर आणि दुष्काळमुक्त करण्यासाठी समाजाच्या सहभागाला पाठबळ देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारचे वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सहकार्य करत आहेत. दि. 2 ऑक्टोंबरला वर्धा येथील कार्यक्रमात राज्यातील विविध 75 नद्यांसाठी कार्यरत असलेले 110 जलनायक सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडे डाॅ. सिंह, अभिनेते चिन्मय उदगीरकर, श्री. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जलकलश आणि ध्वज सुपूर्द केला जाईल. दि.15 ऑक्टोंबर 2022 रोजी भारतरत्न डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी राज्यातील 75 नद्यांवर एकाचदिवशी नदी यात्रेला सुरवात होईल. त्यामध्ये नदी अभ्यासक, नदी प्रेमी, शेतकरी, विद्यार्थी, नदीचे स्टेक होल्डर, सरकारी यंत्रणांमधील अधिकारी यांचा सहभाग राहील. प्रत्येक नदीच्या यात्रेवेळी किमान 100 जणांचा सहभाग राहील, असा प्रयत्न राहील. 26 जानेवारी 2023 पर्यंत चालणाऱ्या नदी यात्रेवेळी नदीच्या सध्यस्थितीची माहिती संकलित करुन अविरल, निर्मल नदी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे, असे श्री ढाकणे यांनी सांगितले.
नदी यात्रेवेळी सरकारी यंत्रणेचे अधिकारी आणि नदीशी निगडीत समाजाच्या सहभागातून सध्यस्थितीची माहिती संकलित केली जाईल. स्थानिक रहिवाश्यांकडून नदी अविरल, निर्मल होण्यासाठी पारंपारिक ज्ञान समजावून घेतले जाईल. त्याला आधुनिक विज्ञानाची जोड देत आराखडा तयार केला जाईल. या आराखड्याची महाराष्ट्र सरकारचे सहकार्य आणि समाजाच्या सहभागातून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल. नदी महोत्सवासाठी मुंबईचे किशोर धारिया, प्रा. स्नेहल दोंदे, नाशिकचे राजेश पंडित, औरंगाबादचे रमाकांत कुलकर्णी, अनिकेत लोहिया, प्रमोद देशमुख, पुण्याचे विनोद बोधनकर, डाॅ. सुमंत पांडे, नागपूरचे प्रद्युम सहस्त्रभोजने, वर्धाचे माधव कोटस्थाने, सोलापूरचे डाॅ. श्रीनिवास वडकबाळकर, वैजीनाथ घोंगडे, बाळासाहेब ढाळे, दिलीप नागणे, कोल्हापूरचे संदीप चोडणकर, नंदूरबारचे प्रा. एच. एम. पाटील, जळगावचे उज्वल चव्हाण, अमरावतीचे अरविंद कडवे आदी प्रयत्नशील आहे, गोदामाई प्रतिष्ठान कोपरगावाचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी सांगितले.