संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी- भाजपाचे स्व. नेते गोपीनाथ मुंडे यांच्या २०११ सालच्या दौऱ्यावेळी विरोधकांनी कटकारस्थान रचून दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यातून पूर्वाश्रमी तत्कालिन भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रतापकाका ढाकणे, युवानेते गहिनीनाथ शिरसाठ यांच्यासह ७ जणांची जिल्हा न्यायाधीश अहमदनगर यांनी निर्दोष मुक्तता केल्याने शनिवारी (दि.२४) चिंचपूर पांगुळ येथे युवानेते गहिनीनाथ शिरसाठ यांचा चिंचपूर पांगुळ ग्रामस्थांनी फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
२०११ साली पाथर्डी तालुका व शहरात स्व. नेते गोपीनाथ मुंडे यांचा दौरा तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष अॕड. प्रताप ढाकणे यांनी विकासकामे शुभारंभ करण्यासाठी आयोजित केला होता.या दौऱ्यात पक्षातीलच काही विरोधकांनी श्री.ढाकणे यांच्यासह त्यांच्या काही समर्थकांविरोधात कटकारस्थान रचत वाद घातला. भादवि.कलम ३०७, ३२४, ३२६, ३२४ व आर्म ॲक्टनुसार खोटे गुन्हे पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल केले होते.
वास्तविक यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नव्हते, मात्र विरोधकांच्या सांगण्यावरून स्थानिक यंत्रणांनी विनाकारण संबंधित आरोपपत्र न्यायालयीन लढाईसाठी सादर केले. जो तब्बल ११ वर्षे चालला.
गहिनाथ शिरसाठ यांचा सत्कार ग्रा.प.जेष्ठ सदस्य विष्णू शंकर खाडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उद्धव केदार , नितीन बारगजे, जगन्नाथ बडे, डॉ अशोक बडे, पत्रकार सोमराज बडे, बाप्पू बडे, विक्रमराव बडे, अंबादास राजगुरू, आनंद रंधवे, नामदेव बडे, सोपान बडे,बाळासाहेब बडे,पप्पू साळवे, बडे मुकादम, नवनाथ बडे, पोपट दामोधर बडे, गणेश भोसले, दादा राजगुरू, राम बडे, संजय बारगजे, अशोक बडे चेअरमन, सुखदेव बडे, गहिनाथ बडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकलन : सोमराज बडे