संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (Vedio News)
आष्टी- नगर -बीड रेल्वे आणि लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न हा विषय सर्वांना परिचित आहे. सुमारे तीन दशकानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांचे हे स्वप्न सत्यात उतरले असून अहमदनगर-बीड मार्गे रेल्वे धावण्यास सज्ज झाली आहे.
रेल्वेची झुकझुक आता बीड जिल्ह्याला दररोज ऐकण्यास मिळणार आहे, नगर-बीड-परळी रेल्वेचे हे स्वप्न दृष्टीक्षेपात आल्याने बीड जिल्हात दळणवळणाच्या सुविधेत भर पडणार आहे. नगर ते न्यू आष्टी रेल्वेचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सुमारे ६६ किमीचा हा पहिला टप्पा बीड जिल्ह्यातील दळणवळणाच्या सुविधेत मैलाचा दगड ठरणार आहे.
नगर-आष्टी रेल्वेच उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे , भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा, खा. सुजय विखे पा., आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रेल्वेचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमात सहभाग घेऊन हिरवा झेंडा दाखवून उपस्थितांशी संवाद साधला.
👉या प्रकल्पात मोदींनी का घातले लक्ष ?
अहमदनगर-बीड-परळी या मार्गावर २६१ किमी.चा हा रेल्वे प्रकल्प असून सदर प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च हा ४८०५ कोटी रुपये आहे. त्यापैकी निम्मा खर्च राज्याच्या तिजोरीतून दिले जाणार आहेत. २०१९ पूर्वीच फडणवीस सरकारने राज्य सरकारच्या हिशाचा ६० ते ७० टक्के निधी प्रकल्पासाठी दिलेला आहे.
२०१४ मध्ये केंद्रात व महाराष्ट्रात भाजपची सत्ता येताच या प्रकल्पाची फाईल पटकन हालली. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांशी संपर्क करून या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घातले होते.
त्यावेळी संबंधित रेल्वे अधिकार्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून घेतलेला आढावा आणि या प्रश्नासाठी दिलेल्या सुचना हा विषय चर्चेचा ठरला आहे.त्यांनतर राज्यमंत्री मंडळ बैठकीत या रेल्वे प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीचा अर्धाभार राज्य सरकार उचलणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य सरकारने ५० टक्के आर्थिक सहभाग दिल्याने हा प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता.
👉सरकारची सकारात्मकता आणि मुंडे भगिनींचा पाठपुरावा.
१९९० च्या काळापासून विविध कारणांमुळे हा रेल्वेमार्गाचा प्रस्ताव रखडला होता. मात्र, भाजप सरकारने गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. केंद्रासह राज्य सरकारने या प्रकल्पाला अजेंड्यावर घेत पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी घेतली. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असताना पंकजा मुंडे यांनी तर खासदार प्रीतम मुंडेंनी नेहमीच पाठपुरावा करत हा प्रकल्प दृष्टीक्षेपात आणण्यासाठी कुठलीच कसर सोडली नसल्याचे दिसून येते.
👉नगर-बीड रेल्वेमार्ग व स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडेसाहेब
मागास असलेल्या मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढायचा असेल, तर दळणवळणाच्या मुलभूत,पायाभूत सुविधा भक्कम असायला हव्यात, असे गोपीनाथ मुंडे म्हणत. बीड जिल्यास जर विकासाच्या रुळावर न्यायचे असेल तर दळवळणासाठी रेल्वे धावलीच पाहिजे, असे स्व.गोपीनाथ मुंडेसाहेब यांचे स्वप्न होते. २००९ मध्ये लोकसभेत गेल्यानंतर स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी या नगर- बीड रेल्वेसाठी विशेष प्रयत्न केले.
सदर रेल्वे चालू झाल्याने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर हसू दिसून आले आहे. शेतकऱ्यांना आता आपले शेतीमाल थेट पुणे, मुबई या ठिकाणी या रेल्वेच्या माध्यमातून पोहचवता येणार आहे.
✍संकलन-सोमराज बडे
📞९३७२२९५७५७