संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
New Delhi – देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या(सोमवार) २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास मुर्मू देशाच्या सर्वोच्च पदाची शपथ घेणार आहेत. मुर्मू या पहिल्या आदिवासी माहिला आहेत, ज्या या पदापर्यंत पोहोचल्या. दिल्लीतील संसद भवन सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
राष्ट्रपतींच्या सोहळ्यात राज्यसभेचे अध्यक्ष, पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष, केंद्र सरकारचे मंत्री, राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य, केंद्र सरकारचे नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना देशाच्या सरन्यायाधीशांकडून शपथ दिली जाणार असून २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे.