संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – तालुक्यातील वडगांव येथील जिओ कंपनीच्या मनोऱ्यामुळे (ट्रान्समिशन टॉवर) ‘असून अडचण अन नसून खोळंबा’ अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वारंवार बंद पडत असल्याने,किंवा वारंवार कॉल ड्रॉप ,फोन न लागणे अश्या अनेक संपर्कात निर्माण होणाऱ्या अडचणी मुळे येथील ग्राहक त्रस्त झाले आहेत. परिसरातील सर्व ग्राहक या एकमेव मनोऱ्यावर अवलंबून आहेत,या परिसरामध्ये जिओ वगळता अन्य दुसऱ्या कुठल्याही कंपनीचे नेटवर्क मिळत नसल्यामुळे याच मनोऱ्यावर सर्व ग्राहकांचा अतिरिक्त भार येतो.
परिसरामध्ये ग्राहकांची संख्या जास्त असूनही रिलायन्स जिओ कंपनीने कमी क्षमतेचा मनोरा उभारल्याने हि समस्या निर्माण होत आहे.यामुळे हे टॉवर वारंवार बंद पडत आहे. यामुळे ग्राहकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तरी वडगांव येथील टॉवरची क्षमता लवकरात लवकर वाढवावी,अशी मागणी वडगांव परिसरातील ग्राहकांकडून केली जात आहे.
✒️संकलन-पत्रकार सोमराज बडे