संग्राम सत्तेचा वृत्तसेवा ऑनलाईन नेटवर्क मुंबई : राज्यात पुन्हा एकदा हिंदुत्ववादी सरकार स्थापन होणार असून एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री असतील. तेच आज पदाची शपथ घेतील आणि नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी घोषणा भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.